AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vedanta Project : आता स्वाक्षरी मोहीम, भविष्यात फक्त आदेशाची वाट पाहणार, युवा सेनेची पुढची भूमिका काय?

देशात लोकशाही आहे, याचा विसर भाजपाला पडला की काय..! गेल्या काही वर्षापासून या पक्षाच्या वर्तनाने सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत आहे. असे असताना देखील या पक्षाकडून जनतेला कायम ग्राह्य धरले जाते. कुणालाही ग्राह्य धरणे तसे धोकादायकच आहे.

Vedanta Project : आता स्वाक्षरी मोहीम, भविष्यात फक्त आदेशाची वाट पाहणार, युवा सेनेची पुढची भूमिका काय?
Image Credit source: Mumbai tak
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 15, 2022 | 4:16 PM
Share

परभणी :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्पाचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर विरोधकांकडून (State Government) राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी तर आंदोलनाही सुरवात झाली आहे. युवा सेनेच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे. एवढे सर्व होऊनही याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली नाहीतर मात्र, (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रणनीती ठरवली जाणार असल्याचे युवासेनेच वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. तर विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा याचे उत्तर जनतेला देण्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

युवासेनेची स्वाक्षरी मोहिम

राज्य सरकारच्या धोरणामुळेच वेदांता सारखा मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला आहे. राज्य सरकारची भूमिका ही संशयास्पद असून गुजरातच्या हितासाठीच राज्य सरकारने असा निर्णय घेतला का असा, सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत जनतेच्या मनात काय आहे? हे जाणून घेण्यासाठी युवासेनेच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे.

जनतेला गृहीत धरण्याचा डाव

देशात लोकशाही आहे, याचा विसर भाजपाला पडला की काय..! गेल्या काही वर्षापासून या पक्षाच्या वर्तनाने सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत आहे. असे असताना देखील या पक्षाकडून जनतेला कायम ग्राह्य धरले जाते. कुणालाही ग्राह्य धरणे तसे धोकादायकच आहे. मात्र, कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची आणि जनतेवर ती लादायची ही भाजपाची परंपरा असल्याचा आरोप युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

प्रश्नांबाबत उदासिनता, पक्ष वाढवण्यातच रस

राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी या सरकारला काही देणे-घेणे राहिलेले नाही. केवळ पक्ष संघटन आणि राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजकारण तर सोडाच पण विकास कामामध्ये अडथळी निर्माण करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. त्यामुळे वेदांता प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला नाही किंवा याबाबत स्पष्टीकरण जर दिले नाही तर मात्र, आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुन आंदोलन छेडले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार