AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

| Updated on: Jul 29, 2026 | 12:54 PM
Share

गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून हजारो भाविकांनी अक्कलकोटमध्ये मोठी गर्दी केली असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या निमित्ताने दरवर्षी हजारो भक्त अक्कलकोटमध्ये येऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. यंदाही राज्याच्या विविध भागांसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी अक्कलकोट गाठले आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली असून, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवरही विशेष भर देण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, महाआरती आणि प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण अक्कलकोट नगरी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरणाने दुमदुमून गेली असून, भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.

Published on: Jul 29, 2026 12:52 PM

Follow Us