मोदींना पंतप्रधान मानण्यास नकार देणाऱ्या ममता दीदी शपथविधीला उपस्थित राहणार!

| Updated on: May 28, 2019 | 8:02 PM

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बंगालमधील सत्ताधारी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनी तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान मानत नसल्याचंच सांगितलं होतं. पण मोदींच्या शपथविधीसाठी ममता दीदी एक दिवस अगोदरच दिल्लीत दाखल होणार आहेत. 30 […]

मोदींना पंतप्रधान मानण्यास नकार देणाऱ्या ममता दीदी शपथविधीला उपस्थित राहणार!
Follow us on

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बंगालमधील सत्ताधारी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनी तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान मानत नसल्याचंच सांगितलं होतं. पण मोदींच्या शपथविधीसाठी ममता दीदी एक दिवस अगोदरच दिल्लीत दाखल होणार आहेत. 30 मे रोजी होत असलेल्या शपथविधीसाठी ममता दीदी 29 मे रोजीच दिल्लीत येतील.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी टीएमसीने लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 22 जागा जिंकल्या, तर भाजपने 18 जागा मिळवल्या. निवडणूक सुरु असतानाच फनी वादळाने ओदिशा आणि कोलकात्यात हाहाःकार माजवला होता. ओदिशाने केंद्र सरकारची मदत घेतली, पण आपण मोदींनी पंतप्रधान मानतच नाही, असं सांगत ममता बॅनर्जींनी मोदींचा फोनही घेतला नव्हता. पण शपथविधीचं निमंत्रण मात्र स्वीकारलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला BIMSTEC देशांच्या प्रमुखांसह आठ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. बिम्सटेकमध्ये भारतासह दक्षिण आशियातील आणि पूर्व आशियातील बंगालच्या खाडीशी संबंधित सात देश आहेत. यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटानचा समावेश आहे. याव्यतिरिक्त किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि मॉरिशिअसच्या पंतप्रधानांनाही निमंत्रण देण्यात आलंय.

मोदींनी सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवलंय. या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला 353 जागा मिळाल्या आहेत, तर यामध्ये एकट्या भाजपच्याच 303 जागा आहेत.