AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेगात सुरु आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांची घरवापसी निश्चित झाली आहे. ते उद्या म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करतील. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये साळोखे यांचाही समावेश होता. […]

शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेगात सुरु आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांची घरवापसी निश्चित झाली आहे. ते उद्या म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करतील.

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये साळोखे यांचाही समावेश होता. साळोखे दोन वेळा कोल्हापूर शहराचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुना शिवसैनिक परत आल्याने कोल्हापुरात शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे.

शिवसेना सोडून गेलेल्या अनेकांची पुन्हा घरवापसी झाली आहे. नुकतेच मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनीही पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना सोडून मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण शिवसेनेची ओढ लागल्याने आपण घरवापसी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडणारे आणखी एक आमदार म्हणजे कालिदास कोळंबकर. ते सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचाही भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालाय. काही अटी ठेवत त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय.

कोण आहेत सुरेश साळोखे?

6 मे 1986 ला कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना 1986 ते 1990 -जिल्हाप्रमुख 1992 ला जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड 1995 ला आमदार 2000 साली आमदार 2005 साली मालोजीराजेंकडून पराभूत 2005 ला नारायण राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर 2015 ला मनसेमधून विधानसभा लढवली

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली