…म्हणून भर सभागृहात सेना नगरसेवक मामा लांडेंना श्रीखंडाचा डबा भेट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : भूखंडाचं श्रीखंड शिवसेना खात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेना नगरसेवक मामा उर्फ दिलीप लांडे यांना श्रीखंडाचा डबा भेट दिला. यावेळी शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेविका मामा लांडेंसाठी पुढे सरसावल्या आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. मुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवक एकवटतानाही यावेळी दिसले. “चोर है चोर है, मामा लांडे […]

...म्हणून भर सभागृहात सेना नगरसेवक मामा लांडेंना श्रीखंडाचा डबा भेट
Follow us on

मुंबई : भूखंडाचं श्रीखंड शिवसेना खात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेना नगरसेवक मामा उर्फ दिलीप लांडे यांना श्रीखंडाचा डबा भेट दिला. यावेळी शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेविका मामा लांडेंसाठी पुढे सरसावल्या आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. मुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवक एकवटतानाही यावेळी दिसले. “चोर है चोर है, मामा लांडे चोर है, चोर है चोर है, शिवसेना चोर है”, अशा घोषणाबाजी विरोधी नगरसेवकांनी केल्या.

शिवसेनेचे नगरसेवक मामा उर्फ दिलीप लांडे हे मुंबई महापालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

भूखंड प्रकरणावरुन मुंबई महापालिका सभागृहात गोंधळ पाहायला मिळला. सुधार समितीत सहा भूखंडांची खरेदी सूचना रद्द करण्याच्या प्रकरणावरुन शिवसेना एकाकी पडल्याचे दिसून आली. आम्ही पापात सहभागी होणार नसल्याचे सांगत भाजपनेही शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेच्या विरोधात भाजपसह काँग्रेस, राष्टृवादी, सपा एकत्र झाले होते.

वाडिया उद्योगसमूहाचे पोयसरमधील 5 आणि अशोक जैन यांचा गोरेगावमधील एक अशा 6 भूखंडांच्या खरेदी सूचना 31 डिसेंबरच्या सुधार समितीत रद्द केल्या होत्या. सुमारे दहा एकरांच्या या भूखंडांची बाजारपेठीय किंमत 4 हजार कोटी असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.