श्रीनिवास वनगा ‘ना घर का, ना घाट का’ : हितेंद्र ठाकूर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई: निवडणुकीत मी भाजपबरोबर राहायला त्यांचे मंगळसूत्र गळ्यात बांधलेलं नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी घेतली. आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही, म्हणूनच श्रीनिवास वनगाला फसवण्याचे धाडस करण्यात आलं, अशी खरमरीत टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पालघर लोकसभा मतदारसंघ महाआघाडीसाठी आज बैठक झाली. यावेळी बहुजन विकास […]

श्रीनिवास वनगा ना घर का, ना घाट का : हितेंद्र ठाकूर
Follow us on

मुंबई: निवडणुकीत मी भाजपबरोबर राहायला त्यांचे मंगळसूत्र गळ्यात बांधलेलं नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी घेतली. आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही, म्हणूनच श्रीनिवास वनगाला फसवण्याचे धाडस करण्यात आलं, अशी खरमरीत टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

पालघर लोकसभा मतदारसंघ महाआघाडीसाठी आज बैठक झाली. यावेळी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेस, जनता दल, रिपाई , भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान पक्ष बैठकीला उपस्थित होते.

बविआचे हितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे गणेश नाईक, काँग्रेसचे कृपाशंकर सिंह, कॉम्रेड अशोक ढवळे आदी नेते बैठकीला उपस्थित.

यावेळी हितेंद्र ठाकूर म्हणाले, “हे निवडणुकीचे वर्ष. आपण सर्व पक्ष भविष्यात समन्वय साधून  पुढे जायचे आहे. आपण तयारीने उतरलो आहोत, त्यावेळी पळवा पळवी धाक दपटशा झाला. निशाणी लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणे आताच्या युगात शक्य. आपली निशाणी पळवली कारण आपण निषाणीवर अवलंबून आहोत हे दाखवायला. भविष्यात कमळ किंवा धनुष्यबाणही बदलतील”

आता वर्षावर बैठक की उमेदवार बदलावा का? मला यांच्या अकलेची कीव येते. एक मुख्यमंत्री आणि एक वेटिंग मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी बैठक आहे. पण आपण जोरात कामाला लागायचे आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी नमूद केलं.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीला मुख्यमंत्री -गिरीश महाजन, आमदार, नगरसेवक ठाण मांडून बसले होते. पैशाचा पाऊस पडला. थकबाकीदारांची बँकेची लोन क्लिअर झाली. सुगीचे दिवस आले होते. म्हणून लोक या निवडणुकीची वाट पाहतात, असा हल्लाबोल हितेंद्र ठाकूर यांनी केला.

श्रीनिवास वनगाला पळवले होते. इथे निवडणुकीवेळी तळ ठोकून होते. शिवसेनेवाले छाती बडवत होते. तू खासदार होणार…आता काय झाले? असा सवाल त्यांनी विचारला.

श्रीनिवास वनगला बसवले, कारण कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात भीती होती म्हणून. आणि पालघरमध्ये निवडणुकीत पैसे कोण खर्च करणार? म्हणून पैसे खर्च करणारा उमेदवार दिला, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत सांगतील श्रीनिवास तुला जिल्हा परिषदेवर पाठवतो. त्यामुळे श्रीनिवास ना घर का ना घाट का झाला आहे, असा हल्लाबोल हितेंद्र ठाकूर यांनी केला.