AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या मृत्यूआधी त्यांना वचन दिलं की…पंकजाताईंनी सगळं सांगितलं, बोलताना भावुक!

लातूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लातूरमध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी आपले वडील म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण, त्यांची दूरदृष्टी यावरही त्यांनी भाष्य केले.

वडिलांच्या मृत्यूआधी त्यांना वचन दिलं की...पंकजाताईंनी सगळं सांगितलं, बोलताना भावुक!
pankaja munde and gopinath munde
| Updated on: Aug 11, 2025 | 3:44 PM
Share

Pankaja Munde : लातूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लातूरमध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी आपले वडील म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण, त्यांची दूरदृष्टी यावरही त्यांनी भाष्य केले. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले, त्याआधी त्यांना दिलेल्या वचनाबद्दलही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावुक झाल्या.

आज मला माझ्या पित्याच्या पुतळ्याचं…

लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यानंत पंकजा मुंडे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना मला बरेचजण सांगतात की माझी कार्यपद्धती ही गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी नाही. मी ते मान्य करते. कारण माझी काम करण्याची पद्धत ही माझ्या वडिलांना जशी हवी होती, तशीच आहे. आज श्रावणी सोमवार आहे. आज मला उपवास आहे. मी वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आले आहे. आज मला माझ्या पित्याच्या पुतळ्याचं अनावरण करता आलं, अशा भावना यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

मी पालकमंत्री असताना विलासराव देशमुख…

तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाही पुतळा आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रांजळ राकारणाचं मूर्तीमंत उदाहरण या जोडीने उभं केलेलं आहे. या दोन्ही नेत्यांत मैत्री होती. पण त्यांनी एकमेकांच्या पक्षांशी कधीच प्रतारणा केली नाही. ते दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले. मी पालकमंत्री असताना विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण मी पालकमंत्री असताना झाले, अशीही आठवण यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितली.

माझ्या वडिलांचा मृत्यू होण्याआधी…

मला गोपीनाथ मुंडे यांनी हजारवेळा सांगितलेलं आहे की तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आपण ती सुधारित आवृत्ती असली पाहिजे. त्यामुळे मला जसं वाटतं तसं तू काम कर. बऱ्याचवेळा मला जसं वाटतं तसं काम करता येत नाही, असं त्यांनी मला सांगितलं होतं. म्हणूनच तत्त्वांशी, समान्य माणसांच्या हिताशी प्रतारणा न करता, स्वाभिमान गहाण न ठेवण्याचं वचन मी माझे पिता मृत होण्याआधी त्यांना दिलेलं आहे. या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करत राहील, असं वचनही पंकजा मुंडे यांनी जनतेला दिले.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है