अनिल देशमुखांविरोधात अजून कोणतेही पुरावे नाहीत!, परमबीर सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ

आता सिंह यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. आपल्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात अजून कोणतेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

अनिल देशमुखांविरोधात अजून कोणतेही पुरावे नाहीत!, परमबीर सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ
परमबीर सिंह, अनिल देशमुख
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 8:23 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाणे न्यायालय आणि मुंबईतील किला कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून परमबीर सिंह गायब आहेत. मात्र, आता सिंह यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. आपल्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात अजून कोणतेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. (No evidence against Anil Deshmukh, Parambir Singh’s affidavit to the Commission of Inquiry)

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी पतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्याची पुष्टी सिंह यांच्या वकिलांनी केलीय. मागील सुनावणीवेळी सिंह यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाकडे सादर केल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. आरोगाकडून सिंह यांच्याविरोधात अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, सिंह अद्याप एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. चौकशी आयोगाने सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये आणि दोन वेळा 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता.

परमबीर सिंह यांचे प्रतिज्ञापत्र

ठाणे आणि मुंबईतील न्यायालयाकडून अटक वॉरंट

परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

परमबीर सिंह प्रतिज्ञापत्र

परमबीर सिंह बेल्जियममध्ये?

परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचं ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलंय. निरुपम यांच्या या ट्विटने आता मोठी खळबळ उडवून दिली आहे. हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

इतर बातम्या : 

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन

दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचं सीमोल्लंघन, आता अन्य राज्यातही निवडणूक लढवणार? आदित्य ठाकरेंना सांगितला प्लॅन

No evidence against Anil Deshmukh, Parambir Singh’s affidavit to the Commission of Inquiry