एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन

माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसमोर ठेवेन, असं सांगितलं. तर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं वजन वापरुन ही मागणी पुढे न्यावी, अशी मागणी केली आहे.

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन
अनिल परब, प्रवीण दरेकर


मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसमोर ठेवेन, असं सांगितलं. तर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं वजन वापरुन ही मागणी पुढे न्यावी, अशी मागणी केली आहे. (ST Workers Agitation Meeting between Praveen Darekar and Anil Parab on ST workers’ issues)

राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 2 हजार 700 कोटी रुपये दिले आहेत. कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची 17 टक्के मागणी असताना 28 टक्के महागाई भत्ता दिला आहे. तिजोरीवर भार पडत असताना मागण्या मान्य केल्या आहेत. एसटी विलिनीकरण्याचा मुद्दा घेऊन पुन्हा आंदोलन सुरु केलं. याला काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय. विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवेन. एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली नाही. 15 ते 17 टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आज संध्याकाळपासून कामावर यावं. दिवाळीत जर लोकांना त्रास झाला तर मात्र प्रशासकीय कामकाज म्हणून कारवाई करणं भाग पडेल, असं अनिल परब म्हणाले.

कारवाईचा आदेश मागे घेण्याची दरेकरांची विनंती

अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना अनिल परब यांचे आभार मानले. पगार व्यवस्थित होत आहे. त्यांच्या महागाई भत्ता, वेतन आणि इतर भत्त्यात वाढ केलीय. मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले वजून वापरून ही मागणी पुढे न्यावी, ही विनंती केली. पण कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मी एमडींकडे केली आहे की एसटीची विलिनीकरण सरकारमध्ये व्हावे. मला कर्मचाऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. कर्मचारी व्यथित झाले तर परिस्थिती चिघळेल. कारवाईचे दिलेले आदेश मागे घेण्याची विनंती आपण मंत्र्यांकडे केल्याचंही दरेकरांनी सांगितलं.

मंत्री महोदयांनी या विषयाकडे सकारात्मकतेनं पाहिलं आहे. आर्थिक मदत ही परिस्थिती बघुनच करावी लागेल. कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. एक गणित व्यवस्थित जुळवून कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी अनिल परब यांच्याकडे केलीय.

अनिल परबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी

अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. एकूणच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. आता या आंदोलनामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय बिटक असून, अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला जबाबदार परिवहन मंत्री अनिल परब हेच असल्याचा आरोप मनसे नेत दिलीप धोत्रे यांनी केला आहे. या प्रकरणी परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचं सीमोल्लंघन, आता अन्य राज्यातही निवडणूक लढवणार? आदित्य ठाकरेंना सांगितला प्लॅन

भाजप नेत्यांना साखर आयुक्तांचा दणका, FRP न दिल्यानं गाळप परवाने रोखले; शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांचाही समावेश

ST Workers Agitation Meeting between Praveen Darekar and Anil Parab on ST workers’ issues

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI