AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रितम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाण

बीड : काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दादा मुंडे यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्याची सुनावणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. यावेळीच ही मारहाणीची घटना जिल्हाधिकारी कार्यालयातच घडली. उमेदवारी अर्जावर सुनावणी सुरु असताना दादा मुंडे यांनी पहिला आक्षेप नोंदवला. त्यांचे एकूण […]

प्रितम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

बीड : काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दादा मुंडे यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्याची सुनावणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. यावेळीच ही मारहाणीची घटना जिल्हाधिकारी कार्यालयातच घडली.

उमेदवारी अर्जावर सुनावणी सुरु असताना दादा मुंडे यांनी पहिला आक्षेप नोंदवला. त्यांचे एकूण तीन आक्षेप आहेत. पहिला आक्षेप नोंदवल्यानंतर ते वकिलासह खाली आले. खाली आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दादा मुंडे यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी पोलीसही बाजूलाच होते. पण पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही, अशी तक्रार दादा मुंडे यांची आहे.

दुसरीकडे शेतकरी संघटनेचे उमेदवार कालिदास आपेट यांनीही प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. प्रितम मुंडेंनी शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आपेट यांनी केलाय. सध्या उमेदवारी अर्जांची छाननी सुरु आहे. त्यामुळे लवकरच यावर अंतिम निर्णय समोर येईल.

मारहाणीचा व्हिडीओ :

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी