Order Of Zayed | ‘ऑर्डर ऑफ झायद’ने सन्मान, पंतप्रधान मोदींना यूएईचा सर्वोच्च मान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांचा फ्रान्स दौरा आटोपून अबू धाबीला पोहोचले आहेत. मोदींना (Narendra Modi) संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईच्या सर्वोच्च पुरस्काराने (Order Of Zayed) गौरवण्यात येणार आहे.

Order Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना यूएईचा सर्वोच्च मान!
Follow us
| Updated on: Aug 24, 2019 | 1:30 PM

अबू धाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांचा फ्रान्स दौरा आटोपून अबू धाबीला पोहोचले आहेत. मोदींना (Narendra Modi) संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईच्या सर्वोच्च पुरस्काराने (Order Of Zayed) गौरवण्यात येणार आहे. यूएईचा ‘ऑर्डर ऑफ झायद’ (Order Of Zayed) या पुरस्काराने मोदींचा गौरव होणार आहे. या पुरस्काराने सन्मान होणारे मोदी पहिले भारतीय ठरणार आहेत.

‘ऑर्डर ऑफ झायद’ (Order Of Zayed)

  • ‘ऑर्डर ऑफ झायद’ हा यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.
  • राजे, राष्ट्रपती आणि विविध देशांच्या प्रमुखांना सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • या पुरस्काराची सुरुवात 1995 मध्ये झाली
  • यापूर्वी 2007 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, 2010 मध्ये ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ, 2016 मध्ये सौदीचे शाह सलमान बिन अब्दुल्ला अजीज अल सौद आणि 2018 मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

‘हा तमाम भारतीयांचा गौरव’

या पुरस्काराबाबत मोदी म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे तर 1.3 अब्ज भारतीयांचा सन्मान आहे. यूएई आणि भारताच्या घनिष्ठ मैत्रीचा हा पुरावा आहे. दोन्ही देशातील सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी हे संबंध आवश्यक आहेत. भारत आणि यूएईच्या मैत्रीत कोणत्याही सीमेचं बंधन नाही”

दरम्यान, मोदी आज अबूधाबीत प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल.

पंतप्रधान मोदी हे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासह महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त पोस्ट तिकीट जारी करणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा हा तिसरा यूएई दौरा आहे. त्यांचा हा दौरा अत्यंत खास मानला जात आहे. यूएईत पोहोचल्यानंतर मोदींनी खलीज टाईम्सला मुलाखत दिली. मोदींनी गेल्या चार वर्षातील भारत आणि यूएई यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं.

यूएईनेही काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या भारताच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली आहे.

Non Stop LIVE Update
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.