पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं ‘राठोडगिरी’ असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

| Updated on: Feb 11, 2021 | 11:45 AM

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे (Pooja Chavan Suicide Atul Bhatkhalkar)

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं राठोडगिरी असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान
भाजप नेते अतुल भातखळकर, पूजा चव्हाण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : पुण्यातील वादग्रस्त पुजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) भाजपानं आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच (CM Uddhav Thackeray) आव्हान दिलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री राठोडगिरी सहन करणार का? असा सवाल केला आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात विदर्भातल्या एका मंत्र्याचं कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे. त्यालाच भातखळकरांनी उघडपणे नाव घेत राठोडगिरी असं म्हटलं आहे. (Pooja Chavan Suicide Case BJP Leader Atul Bhatkhalkar slams CM Uddhav Thackeray)

पुजा चव्हाणची आत्महत्या मंत्र्यामुळे?

मुळची परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. पण संबंधित मंत्र्यांचं थेट नाव कुणीही घेतलेलं नव्हतं. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपा त्या मंत्र्याचं नाव उघड करताना दिसते आहे.

भातखळकरांनी त्या मंत्र्याचं थेट नाव घेतलं?

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तो संबंधित मंत्री हा विदर्भाचा असून शिवसेनेचा असल्याचंही भातखळकर म्हणतात. एवढंच नाही तर संबंधित मंत्र्यांच्या आडनावावरुन भातखळकरांनी ‘राठोडगिरी’ असा शब्द वापरला आहे. याचाच अर्थ चर्चेत असलेल्या मंत्र्याच्या नावात राठोड हा शब्द असावा.

शिवसेनेची भूमिका काय?

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अजून तरी शिवसेनेनं कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण भाजपा ज्या पद्धतीनं हे प्रकरण आता समोर मांडतय ते पहाता शिवसेनेची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

संंबंधित बातम्या :

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण

(Pooja Chavan Suicide Case BJP Leader Atul Bhatkhalkar slams CM Uddhav Thackeray)