AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडणार! वंचित बहुजन आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली

Prakash Ambedkar VBA Protest News: ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलनाचा तिसरा आवाज उठवला गेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडणार! वंचित बहुजन आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली
| Updated on: Oct 21, 2026 | 11:17 PM
Share

काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांनाही जातीव्यवस्था कायम ठेवायची आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शूद्र आणि अतिशूद्र यांच्यातील भेद दोघांनाही हवा असल्याचेही आंबेडकर म्हणाले आहेत. तर राज्यात दरवर्षी एक कोटी मतं कापली जातील, असा दावाही त्यांनी केला आहे. यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि सीजेपीनंतर आता वंचित बहुजन आघाडीही आंदोलनाचे शस्त्र उगारणार आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरणार आहे. याची तारीखही जाहीर केली आहे.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत काँग्रेस जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन का करत नाही? लढा हा शेवटपर्यंत लढला पाहिजे, अर्धवट सोडून चालत नाही, असं म्हणत येत्या 28 ऑक्टोबरला ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मुंबईत वंचित बहुजन आघाडी मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ते म्हणाले की, एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे, हा नाही तर हा. नाकारलेल्या वर्गाला मान प्रतिष्ठा मिळावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये धम्म परिवर्तन केले. काँग्रेसच्या कोणत्याच संदेशात विजयादशमी आणि परिवर्तन हा शब्द दिसत नाही. जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही. अमेरिका जे करते ते चुकीचं आहे हे बोलण्याचे धाडस येथील व्यवस्थेमध्ये नाही. माझा काँग्रेस पक्षाला सवाल आहे की, जातीअंताचा लढा तुम्ही कोणत्या मार्गाने लढणार? असा सवाल आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन तलवार एका म्यान्यात राहू शकत नाही. एक तर जात राहील किंवा स्वातंत्र्य. शेतकऱ्यांना पाच हजार मिळवण्यासाठी 5,975 खर्च करावे लागतात. सात वेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागत आहे. येण्या जाण्याचा खर्च वेगळा. आरएसएस आणि भाजपच्या फिलॉसॉफीत दान करणे, मदत करणे हा शब्द नाही. दिवाळीपर्यंत तुमच्या नुकसानाची भरपाई मिळाली नाही तर भाजपचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, आमदार, खासदार आणि नेत्यांच्या घरासमोर लाईन लावा. त्याला पाणी आणि जेवण मागा. नाहीतर भाजपच्या नेत्यांच्या घराला घेराव घाला. असं केलं नाही तर भाजपच्या नेत्यांच्या संपत्तीचे आकडे बाहेर काढेल.

ते म्हणाले की, तुमच्या संपत्तीचे आकडे बाहेर काढल्यानंतर तुमच्या संपत्तीची लोकांनी लुट केली तर मला नाव ठेवू नका. दुष्काळाचे संकट मोठे, पाणी जपून वापरा. पाणीच नसेल तर पैशाला उपयोग काय? येत्या काळात दुष्काळ हाताबाहेर जाणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी बैठका घेता तशी महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी बैठक घ्या, मदत जाहीर करा. शेतकऱ्यांसाठी तिजोरीत पैसा नाही असा आम्हाला सांगू नका.

प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की, भाजपचे नेते आमदार खासदार आणि पदाधिकारी यांच्या खात्यात खूप पैसा आहे. काँग्रेस आणि आरएसएस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनाही जाती व्यवस्था हवी आहे. शूद्र आणि अतिशूद्र हा भेद दोघांनाही हवा आहे. राज्यात प्रत्येक वर्षी एक कोटी मते कापतील, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?