AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात लढावं, प्रकाश आंबेडकरांचं पुन्हा चॅलेंज

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या निशाण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असल्याचं दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात लढावं, प्रकाश आंबेडकरांचं पुन्हा चॅलेंज
प्रकाश आंबेडकर यांचं पुन्हा चॅलेंजImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 3:31 PM
Share

अहमदनगर: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या निशाण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे असताना देवेंद्र फडणवीस यांची पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे पेन ड्राईव्ह देण्याची कृती नुरा कुस्तीचा प्रकार असल्याचं म्हटलं होते. आज अहमदगनर (Ahmednagar) येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी त्या आरोपाची पुनरावृत्ती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विधान भवनात पेन ड्राईव्ह वरून चालल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह देणे म्हणजे नुरा कुस्तीचा भाग आहे, खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे आंबेडकर म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात उतरुन लढावं. देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचे व्हिडीओ जनतेसमोर आणून ते मैदानी पैलवान आहेत की नुरा कुस्तीतील पैलवान आहेत, हे दाखवून द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया देणार नाही

हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहेय. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. अहमदनगर येथे असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधलाय. कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचा आलेला नाही. त्यामुळे मी माझी प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. तर, कर्नाटक उच्च न्यायालयात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिकेबद्दल माहिती मांडली होती की नाही याबाबत कल्पना नाही. कारण, या प्रकरणात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिका महत्त्वाची आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेरपणाचं राजकारण करावं

देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण म्हणजे **चे राजकारण असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पंरतु त्यांचा दिलेर पणाही ही दिसला नाही आणि मैदानी पणा ही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली आहे. त्या प्रकाराला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर **चे राजकरण केले, असं म्हणतातस अशी टीका आंबेडकर यांनी केली होती. फडणवीस यांना दिलेरपणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टेप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे होती, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

इतर बातम्या:

वडगाव शेरीमधील पीडित मुलीला महिला आयोग मदत करणार; हल्ला करणाऱ्यानेही विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

गावसकर, सचिन, विराटसारखे दिग्गजही संन्यास घेतात, मग आपण काँग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का देत नाही?; सिब्बल यांचा सवाल

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.