भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली, की संसद आत्महत्या करते : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Aug 29, 2021 | 9:04 AM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याच्या संसदीय कार्यपद्धतीवर सडकून टीका केलीय. भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते, असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली, की संसद आत्महत्या करते : पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

सातारा : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याच्या संसदीय कार्यपद्धतीवर सडकून टीका केलीय. भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते, असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तसेच सर्व खासदार आणि आमदारांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते, असंही त्यांनी म्हटलं. ते कराड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कराडमध्ये अ‍ॅड. आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधी सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पार्लमेंटची निवडणूक लागली की सर्वात मोठा पक्ष आपला नेता निवडून देतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदली करण्याचा वापर आता होऊ लागला आहे. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत अस्तित्वात असलेली कल्पना अंमलात आणली गेलेली नाही.”

“पक्षांतर्गत कायदे बंदीचा पूनर्विचार करायला हवा”

“पार्लमेंटची निवडणूक लागली की पक्ष आपला नेता निवडून देतो. तो नेता निवडला की त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. फक्त त्या ठिकाणी लोकांनी जाऊन वेळ मिळाला तर बोलायचं. नाहीतर भत्ता घ्यायचा आणि घरी जायचं. कारण का तर आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदल करण्याचा आता वापर होऊ लागला आहे. पक्षांतर्गत कायदे बंदीचा पूनर्विचार करायला हवा,” असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

“सर्व खासदार-आमदारांना पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांच्या गुलामाप्रमाणे वागणूक”

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सर्व संसद सदस्यांना आणि विधानसभेच्या आमदारांना थेट मुख्यमंत्र्यांचे अथवा सत्ताधारी पक्षांचे गुलाम अशाप्रकारे वागण्याची सुरुवात झाली आहे. हे मी विधान विचारपूर्वक करतोय. कारण दीड वर्ष मी पार्लमेंटमध्ये घालवली आणि इथे 10 वर्ष झाली. त्यामुळे पक्षांतर्गत कायदे बंदी करण्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. फक्त त्याठिकाणी विश्वासदर्शक ठराव घेणे आवश्यक आहे. बाकी विधेयक मांडणं त्यावर मत प्रदर्शन करणे, विरोध करणे हे अधिकार दिलेले नाहीत.”

“पंतप्रधान आणि आयएएस अधिकारीच सरकार चालवतात”

“व्हिफ आला की मग तुम्ही फक्त हात वर करायचा. पक्षाने सांगितले की तुम्ही या विधेयकावर अमुक अमुक सही करा की संपलं. त्यामुळे आपल्याकडे दोनच कलमं आहेत एक पंतप्रधान आणि त्यांच्या अंतर्गत असणारे आयएएस अधिकारी. सध्या तेच सरकार चालवतात आहे,” असं मत आमदार चव्हाण यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा

वडेट्टीवार म्हणाले, खात्यावर पैसे पाठवू, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, बँक खाते नाही त्यांना रोख रक्कम द्या!

जणगणनेत 8 कोटी चुका नाहीत, एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित; चव्हाणांकडून फडणवीसांची पोलखोल

चार दिवस लसीकरण बंद करून रेकॉर्ड केल्याचा दावा करायचा हा पोरखेळ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला

व्हिडीओ पाहा :

Prithviraj Chavan criticize Modi government over parliament working method