पृथ्वीराज चव्हाणांचं नेमकं काय ठरलंय ?

| Updated on: Sep 30, 2019 | 3:26 PM

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan karad south constituency) कराड दक्षिण मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचं नेमकं काय ठरलंय ?
Follow us on

मुंबई :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan karad south constituency) कराड दक्षिण मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाले आह. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan karad south constituency) यांनी आज (30 सप्टेंबर) कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज घेतला आहे. पण लोकसभा की विधानसभा लढवणार हे दोन दिवसात स्पष्ट करेन, असं चव्हाण यांनी सांगितले.

गेले काही दिवासंपासून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण चव्हाण यांनी आज कराड दक्षिण मतदारसंघासाठी अर्ज घेतला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण नक्की कराड दक्षिणमधून लढणार की सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढणार, असा प्रश्न सध्या उपस्थित राहत आहे.

नुकतेच काही दिवासांपूर्वी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव या जागेसाठी सुचवले होते. मात्र चव्हाणांनीही अजून स्पष्ट केलेले नाही.

“मी अर्ज घेतला आहे. 3 ऑक्टोबरला अर्ज दाखल करेन. पण सातारा लोकसभा की कराड दक्षिण विधानसभा हे दोन दिवसांनी स्पष्ट करेन”, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता या जागेवर राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.