पार्थ पवारांना Y प्लस नव्हे तर…; सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा खोचक टोला

Rohit Pawar on Parth Pawar Security : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार पवारांचे पुत्र आणि बंधू पार्थ पवार यांना खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र डागलं आहे. वाचा सविस्तर...

पार्थ पवारांना Y प्लस नव्हे तर...; सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 5:25 PM

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. पार्थ पवारांना खूप कमी दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे. पंतप्रधानांना जी सिक्युरिटी वापरली जाते ती सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला आहे. तसंच बारामतीतील लढतीवरही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

रोहित पवारांचा टोला

पार्थ पवारांच्या वाय प्लस सुरक्षेबाबत काही विश्लेषक याबद्दल वेगळ्या अर्थाने बोलत आहेत… मध्ये गाडी असते, दोन्ही बाजूला दोन गाड्या असतात. या इलेक्शन मध्ये जो पैसा वापरला जाणार आहे. या इलेक्शनचा पैसा या गाड्यामधून जाईल की काय असं शंका व्यक्त केली जाते. सिक्युरिटी गाड्या एका राजकीय व्यक्तीच्या मुलाला दिल्या जात असतील तर अनेक शंका निघू शकतात. लोक याबद्दल वेगवेगळी चर्चा करत आहे. पोलीस गाड्या आणि ॲम्ब्युलन्सचा वापर देखील पैसे देण्यासाठी वापरला गेला. असं बोललं जात होतं, असं रोहित पवार म्हणालेत.

बारामती मातदारसंघावर म्हणाले…

बारामती सुप्रिया सुळेंची लीड आम्ही तीन लाख धरत होतो. बारामती निवडणुक आता लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. सुप्रिया सुळे आधी तीन लाख मताने येतील, असं वाटत होतं. मात्र आता चार लाख मताधिक्याने त्या निवडून येतील. खडकवासलामधून लीड लोकच देणार आहेत. मोठे नेते सोसायटीतमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत. तर राज्यभर फिरत आहेत. काही नेत्यांना आता सोसायोटी लेव्हल जावं लागत आहे.भाजपचा दबाव आहे. काही लोक दबाव सहन करतात काही दबाव सहन करत नाहीत. लोक आमची वाट बघत बसतात. भाजपला वाटत ते अजित पवार यांच्याबाबत केलं आहे, असं रोहित पवार म्हणाले.

आधी अजितदादा बैठक बोलवत असे. आता दादांना बोलवावं लागत आहे. हे दुर्दैव आहे. राज ठाकरेंची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात झाली तर सुप्रियाताईंचं लीड 40 हजाराने वाढेल एवढं मात्र नक्की, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.