संतोष बांगर चौथी नापास थोतांड माणूस, माझ्यासमोर येऊन दाखवावं, महिला नेत्याचं चॅलेंज!

ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज जहरी टीका केली.

संतोष बांगर चौथी नापास थोतांड माणूस, माझ्यासमोर येऊन दाखवावं, महिला नेत्याचं चॅलेंज!
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 21, 2022 | 3:29 PM

पुणेः संतोष बांगर (Santosh bangar) हा चौथी पास थोतांड माणूस आहे. तो फक्त बोलू शकतो. काहीही करू शकत नाही. हिंमत असेल तर अयोध्या पोळसमोर येऊन दाखवावे, असं ओपन चॅलेंज अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांनीच दिलंय. पुणे युवा सेनेच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी हे आव्हान दिल्यानंतर संतोष बांगर यांची प्रतिक्रिया काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज जहरी टीका केली. त्यामुळे अयोध्या पोळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. यापूर्वीदेखील बांगर यांना थेट आव्हान देणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती

संजय राऊत यांच्यावर टीका करताना आज संतोष बांगर यांची जीभच घसरली. संजय राऊत पागल झालेला पिसाळला कुत्रा आहे. त्याच्या कानशीलात वाजवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 110 कोटी रुपयांचा नागपुरात भूकंप घोटाळा असून या मांजर आणि बोक्यांत त्याची वाटणी झाली आहे का, असा सवाल राऊत यांनी केला.

शिंदे यांच्यावर अशी टीका केल्यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांना सुनावलं. त्यानंतर अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांनाच आव्हान दिलंय.