युवक काँग्रेस आक्रमक, राज्यपाल हटाव मागणी शिगेला, कुठे झालं आंदोलन?

| Updated on: Dec 02, 2022 | 1:38 PM

पुण्यात राजभवन परिसरात युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केलं.

युवक काँग्रेस आक्रमक, राज्यपाल हटाव मागणी  शिगेला, कुठे झालं आंदोलन?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणेः राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अधिकच आक्रमक होत आहे. पुण्यात आज राज्यपाल दौऱ्यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हातात घेऊन शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

तर काहींनी हातात काळे झेंडे घेऊन राज्यपाल हटाव अशा घोषणा दिल्या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

पुण्यात राजभवन परिसरात युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केलं.

पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज राज्यपालांचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. मात्र युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचा जोरदार निषेध केला.

युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राज भवनच्या बाहेर राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

राज्यपाल नव्हे तर भाजपाल असून त्यांनी छत्रपती शिवजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आम्ही आंदोलन केलंय.

स्वराज्य संघटनेचंही तीव्र आंदोलन

आज पुणे येथे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आलेले असून स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी, काळे झेंडे दाखवले म्हणून ‘स्वराज्य’ च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत ? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.