IND vs SA : शुबमन गिलला संघात ठेवायचं की नाही? दुसऱ्या टी20 सामन्यातही वाईट स्थिती
भारत आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या गिलची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. वारंवार संधी मिळूनही त्याचं सोनं करण्यात त्याला अपयश आलं आहे. दुसऱ्या टी20 सामन्यातही तसंच काहीसं पाहायला मिळालं.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या दोन्ही टी20 सामन्यात भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय टी20 संघात शुबमन गिलची उपकर्णधार म्हणून एन्ट्री झाली. त्यानंतर त्याने ओपनर म्हणून प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली. पण त्याची बॅट काही चालली नाही. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी20 मालिकेतील कित्ता त्याने या मालिकेतही गिरवला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात शुबमन गिल फेल गेला आहे. पहिल्या सामन्यात फक्त 4 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. शुबमन गिलला आणखी किती संधी देणार? तसेच संजू सॅमसनला किती वेळा डावलणार? असा प्रश्न विचारला आहे.
दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 4 गडी गमवून 213 धावा केल्या. तसेच विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी भारताला चांगल्या ओपनिंगची गरज होती. पण पहिल्याच षटकात टीम इंडियाला शुबमन गिलच्या रुपाने धक्का बसला. लुंगी एनगिडी पहिलं षटक टाकत होता. पहिल्या चार चेंडूवर 9 धावा आल्या होत्या. पाचव्या चेंडूवर स्ट्राईकसाठी शुबमन गिल आला होता. पण पहिल्याच चेंडूवर बाद बाद झाला. रीझा हेंड्रिंक्सने त्याचा झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे षटकात मोठ्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला धक्का बसला.
दुसऱ्या टी20 सामन्यात शुबमन गिल गोल्डन डकवर बाद झाला. टी20 क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिल गोल्डन डकवर बाद होण्याची पहिलीच वेळ आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात आता शुबमन गिलला पुन्हा संधी दिली जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण त्याच्यासाठी संजू सॅमसनला दोन्ही सामन्यात बेंचवर बसायला लागलं. आता कर्णधार सूर्यकुमार यादव संजू सॅमसला संधी देईल की शुबमनला डावलेल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
