शुबमन गिल कॉपी करण्याच्या नादात होत आहे फेल? नेमकं काय झालं ते जाणून घ्या
शुबमन गिलला टी20 फॉर्मेटमध्ये उपकर्णधार करून पुन्हा एकदा स्थान दिलं आहे. पण त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी होताना दिसत नाही. या वर्षात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. असं असूनही संजू सॅमसनला डावलून त्याला संधी दिली जात आहे.

शुबमन गिलकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जातं आहे. त्यामुळे कसोटीनंतर वनडे क्रिकेट संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं. इतकंच काय तर त्याला टी20 संघाचं उपकर्णधारपद सोपवलं आहे. म्हणजेत भविष्यात या फॉर्मेटचं कर्णधारपद भूषवताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.. पण टी20 फॉर्मेटमधील त्याची कामगिरी निराशाजनक आहे. खेळपट्टीवर तग धरून खेळणं देखील त्याला कठीण जात आहे. त्यामुळे त्याच्यावर टी20 फॉर्मेटमध्ये धावा करण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे या दबाबात विकेट फेकून देत असल्याचं दिसत आहे. कटक टी20 सामन्यातही असंच दिसून आलं. चला जाणून घेऊयात शुबमन गिल का फेल होत आहे ते…
राइड हँडेड शुबमन गिल टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. खरं तर त्याचा खेळ तसा नाही. पहिल्या टी20 सामन्यात गिलने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंड़ूवर आक्रमक प्रहार करत चेंडू वर चढला आणि झेल बाद झाला. गिलची बॅटिंगची अशी शैली पाहून क्रीडाप्रेमीही हैराण आहेत. कारण गिल अशा पद्धतीने फलंदाजी करतच नाही. विराट कोहलीसारखी त्याच्या फलंदाजीचा अंदाज आहे. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर मनमोकळेपणाने फटकेबाजी करतो. पण टीम इंडिया ज्या पद्धतीने टी20 क्रिकेट खेळत आहे त्यात या रणनितीला फारसा वाव नाही. त्यामुळे गिल खेळपट्टीवर आल्यानंतर आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न करतो.
संजू सॅमसनचाही दबाव सहन करावा लागत आहे?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून शुबमन गिल टी20 संघाचा भाग झाला आहे. त्याने संजू सॅमसनची जागा घेतली असून ओपनिंग करत आहे. संजू सॅमसन आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. त्याची अभिषेक शर्मासोबत परफेक्ट जोडी झाली होती. त्याचा स्ट्राईक रेट 170हून अधिकचा आहे आणि तीन टी20 शतक ठोकले आहेत. त्यामुळे गिलवर दबाव वाढला आहे. संजू सॅमसनसारखा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच काय तर अभिषेक शर्माही 200च्या स्ट्राईकने फटकेबाजी करतो. त्यामुळे गिलवर दबाव आहे आणि तो दिसत आहे. गिलने या वर्षात एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलेलं नाही. त्याची कामगिरी अशीच राहिली तर त्याला संघातून वगळलं जाऊ शकतं.
