राहुल गांधींकडून श्वान पथक आणि जवानांच्या योगाची खिल्ली

सैन्यातील श्वान पथक आणि जवानांनीही योग दिन साजरा केला. पण श्वान पथक आणि जवानांच्या योगाचे फोटो शेअर करत New India असं म्हणत राहुल गांधींनी याची खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधींकडून श्वान पथक आणि जवानांच्या योगाची खिल्ली
| Edited By: | Updated on: Jun 21, 2019 | 7:39 PM

नवी दिल्ली : संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे ट्रोल होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व स्तरावर योगासने करण्यात आली. सैन्यातील श्वान पथक आणि जवानांनीही योग दिन साजरा केला. पण श्वान पथक आणि जवानांच्या योगाचे फोटो शेअर करत New India असं म्हणत राहुल गांधींनी याची खिल्ली उडवली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरचे आमदार रमेश मेंडोला यांनीही राहुल गांधींना त्यांचं जुनं ट्वीट दाखवत निशाणा साधलाय. राहुल गांधींनी ऑक्टोबर 2017 मध्ये एक ट्वीट केलं होतं, ज्यात ते म्हणाले होते की लोक मला विचारतात, तुमचे ट्वीट कोण करतं? तर माझा Pidi (कुत्रा) ट्वीट करतो, असं राहुल गांधी म्हणाले होते. याच ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत रमेश मेंडोला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय.

श्वान पथकांकडून चीनच्या हजारो किमीच्या सीमेवर सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून पहारा दिला जातो. गेल्या वर्षी दोन श्वानांचा आयटीबीपीकडून सन्मानही करण्यात आला होता. आम्हाला या श्वानांवर गर्व आहे, असंही रमेश मेंडोला यांनी म्हटलंय.

सैन्याकडूनही योग दिन साजरा करण्यात आला. आयटीबीपीच्या जवानांनी हजारो फूट उंचीवर योगासनं केली, ज्यात श्वान पथकांचाही सहभाग होता. श्वान पथकांची योगासनं पाहून अनेकांना आश्चर्यही वाटलं. आयटीबीपीसोबत पहारा देण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या श्वानांनी योगासनं करुन एक नवीन आदर्श घालून दिला.