रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, माजी आमदार सुरेश लाड यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

| Updated on: Nov 23, 2021 | 7:37 PM

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अचानकपणे त्यांनी पदत्याग केल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी आपल्या पत्रामध्ये दिले आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, माजी आमदार सुरेश लाड यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
suresh lad
Follow us on

रायगड : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अचानकपणे त्यांनी पदत्याग केल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचे लाड यांनी सांगितले.

प्रकृतीचे कारण देत, लाड यांचा राजीनामा

राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. प्रकृतीचे कारण देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध माजी आमदार सुरेश लाड असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. याच संघर्षामुळे कर्जत मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे समीकरण जुळताना दिसत नाही. एकीकडे लाड यांचा थोरवे यांच्याविरुद्ध संघर्ष पाहायला मिळालेला आहे तर दुसरीकडे सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते.

राजीनाम्याचे नेमके कारण काय ?

लाड यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राजीनामा दिल्यानंतर लाड यांनी अधिकृत प्रतिक्रियादेखील दिलेली नाही.

राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग, मजी आमदारांचा प्रवेश  

दरम्यान,  लाड यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी राष्ट्रवादी पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरापासून ते मराठवाड्यातील परभणीपर्यंत अनेक नेते तथा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उल्हासगनरात माजी आमदार पप्पू कलानी यांनी 23 नगरसेवकांसह राष्ट्रवादीत घरवापसी केली. कलानी यांच्या प्रवेशामुळे उल्हासगनरात राष्ट्रवादीला चांगलेच बळ मिळाले आहे. तर दुसरीकडे 11 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्यासह 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं होतं. तर याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता

इतर बातम्या :

Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा

‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता, शरद पवारांच्या अनिल परबांना कोणत्या महत्वाच्या सूचना?