Raj Thackeray : ‘राज ठाकरेंना कोर्टाचा हवाला देत खोटं बोलण्याचा अधिकार नाही’, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन कायदेतज्ज्ञांचं आव्हान

| Updated on: Apr 17, 2022 | 9:20 PM

वकील असीम सरोदे यांनी मात्र मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलंय. न्यायालयाचा हवाला देत राज ठाकरे यांना खोटं बोलण्याचा अधिकार नाही. न्यायालयाचा एक तरी आदेश त्यांनी दाखवावा, असं आव्हानच सरोदे यांनी दिलंय.

Raj Thackeray : राज ठाकरेंना कोर्टाचा हवाला देत खोटं बोलण्याचा अधिकार नाही, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन कायदेतज्ज्ञांचं आव्हान
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Image Credit source: TV9
Follow us on

वर्धा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेतही मिशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध केलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिलेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. हनुमान जयंतीला तर राज्यात सर्वत्र राजकीय उत्सव पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी मात्र मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलंय. न्यायालयाचा हवाला देत राज ठाकरे यांना खोटं बोलण्याचा अधिकार नाही. न्यायालयाचा एक तरी आदेश त्यांनी दाखवावा, असं आव्हानच सरोदे यांनी दिलंय.

‘त्यांनी न्यायालयाचा एक तरी आदेश दाखवावा’

वकील असिम सरोदे यांच्या मते राज ठाकरे जो विषय मांडत आहेत तो अत्यंच चुकीचा आहे. त्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होत आहे. न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरे यांना नाही. त्यांनी न्यायालयाचा एक तरी आदेश दाखवावा, असं आव्हानही सरोदे यांनी राज ठाकरेंना दिलंय. सरोदे यांनी आज वर्धा इथं पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर त्यापेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असं म्हणणं चुकीचं आहे. त्याला कायदेशीर पद्धतीने आपण बधितलं तर भारतातील कोणत्याही न्यायालयाने मशिदींवरील भोंगे काढा असा आदेश कधीच दिलेला नाही. मशिदींवरील भोंगे काढा असा एकतरी निर्णय मला दाखवावा. न्यायालयाचा हवाला देत ते खोटं बोलू शकत नाहीत, असं सरोदे म्हणाले.

राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम

राज ठाकरे यांनी आधी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कात सभा घेतली होती. त्यानंतर 12 एप्रिल रोजी ठाण्यात मोठी सभा घेतली होती. या दोन्ही सभेतून त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. मशिदीवरील भोंगे नाही हटवल्यास हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ठाण्यातील सभेत तर त्यांनी राज्य सरकारला थेट डेडलाईनच दिली होती. 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे नाही हटवले तर मंदिरासमोर भोंगे वाजवू असा इशारा त्यांनी दिला होता.

इतर बातम्या :

Sadabhau Khot : चंद्रकांत पाटलांना अनेकांचा हिमालयात जाण्याचा सल्ला; आता सदाभाऊंनी पवारांनाही करुन दिली एका वक्तव्याची आठवण!

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…