मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’; भर सभेत दाखवलं पंतप्रधान मोदींचे ते भाषण

राज ठाकरेंनी मनसे मेळाव्यात मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. मतदानातील गोंधळ, बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधील त्रुटींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "निवडणुका मॅच फिक्स आहेत," असा गंभीर आरोप करत, त्यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ दाखवून टीका केली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.

मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा पुन्हा लाव रे तो व्हिडीओ; भर सभेत दाखवलं पंतप्रधान मोदींचे ते भाषण
Raj Thackeray Attacks Modi Govt, EC Over Voting Irregularities & Bogus Lists
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2025 | 3:07 PM

मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना पहिला मुद्दा हा मतदानातील गोंधळाचा उचलला आहे. राज ठाकरेंनी मतदानावरून थेट मोदी सरकारवर टीका केली आहे. महायुतीला 232 जागा मिळाल्या होत्या मात्र तरी देखील सर्वत्र सन्नाटा होता. पण मतदार आवाक् झाले होते पण जे निवडून आले तेही आवाक होते. असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. राज ठाकरेंनी मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचं म्हणत थेट निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

“मतदान करा अथवा नका करू मॅच फिक्स आहे”

तसेच “निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले तर सत्ताधारी उत्तर देतात. 2016-17 ला मतदार याद्यांवरून प्रश्न निर्माण केला होता. पण यांना बोगस मतदानाबद्दल विचारलं की राग येतो. ” असं म्हणत त्यांनी थेट मोदी सरकारलाच सवाल केला आहेत. एवढंच नाही तर “मतदान करा अथवा नका करू मॅच फिक्स आहे” असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.

‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत नरेंद्र मोदी यांचे आसाम मधले भाषण ऐकवले

यासर्वांमध्ये राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत नरेंद्र मोदी यांचे आसाम मधले 15-20 सेकंदाचे भाषण ऐकवले. जेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचा त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ राज ठाकरेंना मंचावर लावायला सांगितला होता. या व्हिडीओमध्ये भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आसामच्या सभेतील भाषण असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. दरम्यान हा व्हिडीओ दाखवल्यानंतर, ‘मोदी जे आधी सांगत होते तेच आम्ही सांगतोय’ असं म्हणत राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.

बाहेरून वीस हजार मतदार आणले

मोदींनंतर राज ठाकरे यांनी एका सत्ताधाऱ्याच्या वक्तव्याचा देखील एक व्हिडीओ ऐकवला. त्या व्हिडीओत तो सत्ताधारी सांगताना दिसत आहे की त्यांनी बाहेरून वीस हजार मतदार आणले. हाच मुद्दा राज ठाकरेंनीही उचलला. बाहेरून मतदारांना बोलवलं जात आहे. मतदार याद्यांमध्ये गोंधळ सुरु असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. त्यांनतर ही त्यांनी आणखी एक-दोन व्हिडीओ ऐकवले. आणि सरकारवर निवडणूकीच्या मतदार याद्यांमध्ये खोटी नावं देत असल्याचा आरोप केला आहे.