पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच राज ठाकरेंनी एका कृतीने लक्ष वेधले, नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच राज ठाकरेंनी एका कृतीने लक्ष वेधले. राज ठाकरेंच्या कृतीकडे पत्रकारही पाहतच राहिले.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात वातावरण तापलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. ठाकरे बंधू मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार असून अनेकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ही पत्रकार परिषद सुरू होण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका कृतीने सर्वाचं लक्ष वेधलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊ.

thackeray news
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू यांच्यासहित संजय राऊत, आदित्य ठाकरे देखील उपस्थित होत आहे. पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यातही संवाद होतो, हा दावा केला होता. त्यामुळे दोन्ही बंधू काय बोलणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. ही परिषद सुरू होण्याआधी राज ठाकरेंनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून मोबाईल घेतला. त्यानंतर कॅमेरा सुरू करण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मोबाईल फोनमधून पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांचा फोटा कॅमेऱ्यात कैद केला. राज ठाकरेंच्या या कृतीने साऱ्यांचे लक्ष वेधलं.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, ‘मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी संयुक्त मोर्चा काढला जाईल. 4 तारखेला सकाळी 10 वाजेच्या सुमारास भायखळ्याच्या रिचर्डसन आणि क्रुडास कंपनीजवळ जमतील. हा मोर्चा 11 ते 11.30 वाजता निघेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत पोहोचेल. त्या ठिकाणी एक व्यासपीठ उभारलं जाईल. मोर्चा मुख्यालयाजवळ पोहोचल्यानंतर सभा घेऊन सांगता होईल, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच सभेला राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, फक्त तिरंगा असणार आहे. कारण हा मोर्चा राजकीय नाही. तर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. मोर्चात कोणीही राजकीय झेंडे आणणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणा देखीलदिल्या जाणार नाही, असेही त्यांनी पुढे सांगितलं.
