मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

| Updated on: Oct 01, 2019 | 7:14 PM

मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मतदारसंघातून निवडणूक (MNS candidates first list) लढतील.

मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी (MNS candidates first list) जाहीर केली आहे. या यादीत एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मतदारसंघातून निवडणूक (MNS candidates first list) लढतील, तर शिवसेनेतून मनसेत आलेले नाशिकमधील नगरसेवक दिलीप दातीर यांनाही नाशिक पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, मनसेच्या पहिल्या यादीत अजून मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन नांदगावकर यांचं नाव नाही. मनसेकडून आणखी उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

मनसेचे 27 उमेदवार

  1. प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
  2. प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
  3. अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
  4. संदीप देशपांडे – माहिम
  5. वसंत मोरे – हडपसर
  6. किशोर शिंदे – कोथरुड
  7. नितीन भोसले – नाशिक मध्य
  8. राजू उंबरकर – वणी
  9. अविनाश जाधव – ठाणे
  10. नयन कदम – मागाठाणे
  11. अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
  12. नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
  13. दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
  14. योगेश शेवेरे- इगतपुरी
  15. कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
  16. संजय तुर्डे – कलिना
  17. सुहास निम्हण – शिवाजीनगर
  18. गजानन काळे – बेलापूर
  19. अतुल बंदिले – हिंगणघाट
  20. प्रशांत नवगिरे – तुळजापूर
  21. राजेश वेरुणकर – दहीसर
  22. अरुण सुर्वे – दिंडोशी
  23. हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
  24. वीरेंद्र जाधव – गोरेगाव
  25. संदेश देसाई – वर्सोवा
  26. गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
  27. अखिल चित्रे- वांद्रे पूर्व

मनसेकडून निवडणूक लढवण्याची घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं सांगितलं. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करेन, रोज चार-पाच नावं जाहीर करेन, असं ते म्हणाले.

मनसेचा मेळावा

मनसेने मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. (MNS Vidhansabha election). या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणती ‘राज’गर्जना करणार याची कार्यकर्त्यांसह सर्वांनाच (MNS Vidhansabha election) उत्सुकता लागून होती.