वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा- राज ठाकरे

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा- राज ठाकरे
| Updated on: Sep 19, 2022 | 12:36 PM

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना वेदांता प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी वेदांता प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातला गेला कसा याची चौकशी करा. ही चौकशी व्हायला हवी. सत्य लोकांसमोर यायला हवं, असं राज ठाकरे ठाकरे म्हणालेत. राज्यात उद्योग यायला हवेत, असंही ते म्हणालेत.