AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काढ रे तो पडदा…राज ठाकरेंनी टाकला मतदार घोटाळा बॉम्ब, आकडेवारी देत केलेल्या आरोपाने खळबळ!

Raj Thackeray Speech: विरोधी पक्षांनी मतदार यादीत दुरूस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात भाषण करताना राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवर भाष्य केले आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

काढ रे तो पडदा...राज ठाकरेंनी टाकला मतदार घोटाळा बॉम्ब, आकडेवारी देत केलेल्या आरोपाने खळबळ!
raj thackeray morcha
| Updated on: Nov 01, 2025 | 3:44 PM
Share

Raj Thackeray Speech: विरोधी पक्षांनी मतदार यादीत दुरूस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नेते उपस्थित आहेत. या मोर्चात भाषण करताना राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवर भाष्य केले आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. सर्वच पक्ष दुबार मतदार आहेत असं म्हणत आहेत. भाजपचे लोकही मतदार दुबार आहेत असं म्हणत आहे. मी जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतो. १ जुलैला त्यांनी यादी बंद केली.

  • मुंबई नॉर्थ मतदारसंघात एकूण १७ लाख २९ हजार ४५६ मतदार आहेत, त्यात ६२ हजार ३७० दुबार
  • मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात एकूण १६ लाख ७४ हजार मतदार, दुबार मतदार ६० हजार
  • मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात एकूण १५ लाख ९० हजार मतदार, दुबार मतदार ९२ हजार ९८३
  • मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात एकूण १६ लाख मतदार, दुबार मतदार ६३ हजार
  • मुंबई साऊथ सेंट्रल मतदारसंघात एकूण १४ लाख ३७ हजार मतदार, दुबार मतदार ५० हजार
  • मुंबई साऊथ मतदारसंघात एकूण १५ लाख १५ हजार मतदार, दुबार मतदार ५५ हजार
  • नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ३४ हजार मतदार, दुबार मतदार ९९ हजार
  • मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ८५ हजार, दुबार मतदार १ लाख ४५ हजार
  • पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख १२ हजार मतदार, दुबार मतदार १ लाख २ हजार

हे आकडे सांगितले पुरावा कुठे आहेत हे विचारतील. हे सर्व दुबार मतदार आहेत. (पदडा हटवून दुबार मतदार यादीचा ढीग दाखवला) कल्पना येईल महाराष्ट्रात काय प्रकारचा गोंधळ आहे. एवढा पुरावे दिल्यानंतर सांगतात कोर्टाने सांगितलं निवडणूक घ्या. कुणाला घ्या. कशाला घ्या. कुणाला घाई आहे. पाच वर्ष निवडणूक झाली नाही. अजून एक वर्ष नाही झाल्या तर काय फरक पडतो. त्यातल्या त्यात निवडणुका घेऊन यश मिळवायचं. याला निवडणूक म्हणतात का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...