AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या सूचनांची माहिती राज ठाकरेंनी पत्रकारांना दिली आहे. Raj Thackeray Uddhav Thackeray

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय?
राज ठाकरे, मनसेप्रमुख
| Updated on: Apr 06, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकी विषयी माहिती दिली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी झूम मिटींगमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या सूचनांची माहिती त्यांनी दिली आहे. माझ्याकडे अनेक तक्रारी आणि सूचना आल्या होत्या, त्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. काही सूचना केल्या त्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. (Raj Thackeray suggestions gave to Uddhav Thackeray about Corona Virus Outbreak and Lockdown )

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचना

छोट्या व्यापाऱ्यांना दोन दिवस दुकानं उघडण्याची परवानगी द्या

जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या

बँकांची जबरदस्ती थांबवावी

अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?

वीज बिल आणि व्यवसाय कर 

सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे आणि जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना  सूट द्यावी, राज्याने केंद्राशी बोलावं, अशी सूचना केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

कंत्राटी कामगार 

लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेऊन त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली.  या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.

जीम सलून यांना परवानगी द्या

जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.

सरकारची तिजोरीची परिस्थिती माहिती आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल.

शाळांची फी 

शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीतरी कार्यवाही करावी.  शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत देखील विचार करण्याची सूचना दिली.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करुन पहिली ते आठवी प्रमाणं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाही.खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला, अशीही मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या: 

Raj Thackeray PC LIVE : किंबहुना वापरलं तर चालेल का? राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!

(Raj Thackeray suggestions gave to Uddhav Thackeray about Corona Virus Outbreak and Lockdown )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.