NHM Scam | देवेंद्र फडणवीस म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही, राजेश टोपेंनी आरोप फेटाळले

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून 400 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याचे म्हटले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. (Health Minister Rajesh Tope denied allegations of Devendra Fadnavis about NHM)

NHM Scam | देवेंद्र फडणवीस म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही, राजेश टोपेंनी आरोप फेटाळले
Rajesh Tope_Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 1:45 PM

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही. या योजनेसंदर्भात गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती. गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई निर्देश दिले होते, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.  याप्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे त्यामुळे या मिशनमध्ये काही घोटाळा झालाय, असे म्हणता येणार नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोग्य खात्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा टोपे यांनी दिला. (Health Minister Rajesh Tope denied allegations of Devendra Fadnavis about NHM)

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून 400 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याचे म्हटले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

राजेश टोपे यांनी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विविध विभागांच्या अभिप्रायाने सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले.

महाविकास आघाडी सरकारचा सर्व गोष्टी विचारपूर्वक चालू करण्याचा प्रयत्न आहे. आता अमेरिका, युरोपमध्ये परत‌ लॉकडाऊन करावं लागत आहे. त्यामुळं सावधगिरी बाळगून पावलं उचलावी लागतात. सर्व गोष्टी लगेच चालू करताना विचार करुन निर्णय घ्यावे लागतात, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

अजित पवारांची तब्येत व्यवस्थित

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत व्यवस्थित आहे. कोणतिही काळजी करण्याचे कारण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. अजित पवार यांना दोन तीन दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळेल, असंही त्यांनी सांगितले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केला होता. त्यांनाही योग्य उपचार दिले जात आहेत. पण, त्यांना कोमॉर्बिड असल्यामुळं रुग्णालयात जास्त काळजी घ्यावी लागतेय, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अजित पवार यांना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संबंधित बातम्या :

राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार, फडणवीसांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र.

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा घोटाळा | विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

(Health Minister Rajesh Tope denied allegations of Devendra Fadnavis about NHM)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.