राज ठाकरे तुम्ही आदेश द्या, राजस्थानात मनसेचा झेंडा फडकावतो, राजस्थानी तरुण मनसेच्या प्रेमात

| Updated on: Feb 06, 2020 | 12:01 PM

आता थेट राजस्थानमधील काही कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात (Rajasthani boy interested in mns party) आहे.

राज ठाकरे तुम्ही आदेश द्या, राजस्थानात मनसेचा झेंडा फडकावतो, राजस्थानी तरुण मनसेच्या प्रेमात
Follow us on

जयपूर : आता थेट राजस्थानमधील काही कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात (Rajasthani boy interested in mns party) आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व देशातील हिंदुंचे नेतृत्व करावे, अशी मागणीही केली जात आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून राजस्थानातील एका तरुणाने मनसेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उमेश सर्मा असं या व्हिडीओमधील मुलाचं (Rajasthani boy interested in mns party) नाव आहे.

“राज ठाकरे तुम्ही ज्या प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे चालला आहे. त्यासाठी आम्हीही तुमच्या नेतृत्वात राजस्थानमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. तुम्ही फक्त आदेश द्या, तुमचा झेंडा संपूर्ण राजस्थानमध्येही फडकवला जाईल. इथेही संघटना मजबूत केली जाईल. मनसेला राजस्थानमध्येही खूप उंचावर नेले जाईल”, असं उमेश शर्माने सांगितले.

“9 फेब्रवारीला तुम्ही भारतात राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात ज्या महारॅलीचे आयोजन केले आहे त्याला आमचा पाठिंबा आहे”, असंही त्याने सांगितले.

उमेश शर्मा म्हणाला, “राज ठाकरेंमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेबांचे विचार आम्हाला तुमच्यामध्ये पाहायला मिळतात. आम्हाला आशा आहे की, तुम्ही संपूर्ण देशात हिंदूंचे नेतृत्व कराल.”

दरम्यान, नुकतेच मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करत भगव्या रंगाचा झेंडा घेतला आहे. त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानमधील काही हिंदू कार्यकर्ते मनसेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत.