समोरासमोर येऊनही बोलले नाहीत, सदाभाऊ म्हणाले नंतर बसू, राजू शेट्टी, म्हणतात बसण्याचा अर्थ वेगळा

| Updated on: Feb 02, 2021 | 5:17 PM

राजू शेट्टी हे न्यायालयातून बाहेर पडताना सदाभाऊ खोत हे समोर आले, पण दोघांनीही एकमेकांकडे न पाहताच, काढता पाय घेतला.

समोरासमोर येऊनही बोलले नाहीत, सदाभाऊ म्हणाले नंतर बसू, राजू शेट्टी, म्हणतात बसण्याचा अर्थ वेगळा
सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी
Follow us on

बारामती : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे एकेकाळचे सख्खे मित्र आता एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचे अनेकवेळा दिसून आलं आहे. त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. दोघेही आज एका खटल्यासंदर्भात बारामती न्यायालयात (Baramati Court) हजर होते. राजू शेट्टी हे न्यायालयातून बाहेर पडताना सदाभाऊ खोत हे समोर आले, पण दोघांनीही एकमेकांकडे न पाहताच, काढता पाय घेतला. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट झालीच नाही. (Raju Shetti and Sadabhau Khot pass nearby without speaking at Baramati Court)

याबाबत सदाभाऊ खोत यांना विचारलं असता, ते म्हणाले, “कोरोनामुळे सध्या भेटी कमी झाल्या आहेत. एकमेकांना मिठीही मारता येत नाही. त्यामुळं कोरोना गेल्यावर या विषयावर बसू”

सदाभाऊ खोत कोरोना गेल्यावर बसू असं म्हणाल्यानंतर, त्यावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया जाणून घेतली. राजू शेट्टी म्हणाले, “असंगाशी संग मी करत नाही. बसण्याचे अनेक अर्थ होतात.

बारामती न्यायालयात दोन नेत्यांची हजेरी

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह स्वाभिमानीच्या 50 कार्यकर्त्यांवर 2012 मध्ये बारामतीत झालेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल होते. आंदोलनाच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघेही आज बारामती न्यायालयात हजर होते. सदाभाऊंनी सकाळी कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर कोर्टाच्या कामकाजासाठी दुपारीही ते कोर्टात आले. त्यावेळी राजू शेट्टी कोर्टात हजेरी लावून बाहेर पडत होते. दोघेही एकमेकांना क्रॉस झाले. राजू शेट्टी पायऱ्या उतरत होते, तर सदाभाऊ खोत पायऱ्यांवरुन कोर्टात जात होते. त्यावेळी एकमेकांसमोर येऊनही दोन्ही नेते एकमेकांशी बोलले नाहीत.

सदाभाऊ खोत काय म्हणाले? 

आपण सर्वांच्याच हातात हात देत असतो. पण कोरोनामुळे त्याला बंधने आली आहे. एकमेकांना मिठी मारणं बंद झालं आहे. एकदा का कोरोना गेला की या विषयावर आपण बसू, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. त्यावेळच्या सरकारनं शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार केला. आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. जे आज शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढत आहेत, त्यांनी आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वागणूक दिली ही तपासण्याची वेळ आली आहे. आज मात्र शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत असा अविर्भाव दाखवला जात आहे.

जाणते नेते शेतकऱ्यांबद्दल पुतणामावशीचं प्रेम दाखवत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य म्हणवणाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली.
सहकारातून स्वाहाकार कधी सुरु झाला हे जनतेलाही कळलं नाही. सहकारातील कारखानदारी खासगीत रुपांतरीत होऊन फायद्यात कधी आली हेही जनतेला कळलं नाही.

एका कारखान्याने हौस भागत नाही म्हणून नात्यागोत्यातील लोकांसाठी चार चार खासगी कारखाने उभारणारे महाभागही आहेत. अलीकडील काळात निर्माण झालेल्या वतनदार आणि जहागीरदारांच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय. त्यांच्याविरोधात बोलल्यानंतर प्रशासनाला हाताशी धरुन सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम गेली 35 वर्षे सुरु आहे. नेमका कुणाचा विकास झाला हाही संशोधनाचा विषय आहे.

 दिल्ली आंदोलनावर सदाभाऊंचं भाष्य

काही वर्षांपूर्वी शरद जोशी आणि राकेश टिकैत यांनी परमिट राज बंद व्हावं यासाठी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं होतं. मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हे आंदोलन मोडीत काढलं. आता जे शेतकरी आंदोलन करतायत ते शेतकऱ्यांना मिळणारं स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत.  शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हे आंदोलन राहिलं नसून दिल्लीच्या तख्तावर कोणी बसावं हा दृष्टीकोन ठेवूनच हे आंदोलन होतंय.

कॉंग्रेस आणि डावे पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देतायत. त्याचवेळी नक्षलवादी आणि दहशतवाद माजवणारे लोकही या आंदोलनात घुसलेत.  भविष्यात रेशनिंग व्यवस्था संपुष्टात आणावी लागेल. यात मोठा भ्रष्टाचार. त्यामुळे गरजूंना थेट खात्यात धान्याची रक्कम द्यावी. कॉंग्रेसनं ७० वर्षे शेतकऱ्यांना पिंजऱ्यातला पोपट बनवून ठेवलं. त्याची सुटका करण्याचं काम मोदी सरकारने केलं.

शरद पवारांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करा, आम्ही पाठिंबा देऊ : सदाभाऊ खोत

2006 साली करार शेतीचा महाराष्ट्र सरकाने संमत केला. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सुरुवात बारामतीपासून झाली.  लोक माझे सांगती या शरद पवार यांच्या आत्मचरित्रत करार शेतीचा उल्लेख केला आहे. त्यांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करावं, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

VIDEO 

(Raju Shetti and Sadabhau Khot pass nearby without speaking at Baramati Court)

संबंधित बातम्या 

सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर, राजू शेट्टींच्या ‘टायमिंग’ने भेट टळली!