राजू शेट्टी विधानसभा लढवण्याची चिन्हं, जुन्या सहकाऱ्याविरोधात दोन हात करणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti Vidhan sabha) हे विधानसभेच्या मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. राजू शेट्टी (Raju Shetti Vidhan sabha) यांनी तसे संकेत दिले आहेत.

राजू शेट्टी विधानसभा लढवण्याची चिन्हं, जुन्या सहकाऱ्याविरोधात दोन हात करणार?

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti Vidhan sabha) हे विधानसभेच्या मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. राजू शेट्टी (Raju Shetti Vidhan sabha) यांनी तसे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला. मात्र आता राजू शेट्टी शिरोळ या विधानसभा मतदारसंघातून रणशिंग फुंकण्याची चिन्हं आहेत.

सध्या शिरोळ मतदारसंघात राजू शेट्टी यांचे जुने सहकारी आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील हे प्रतिनिधीत्व करतात. जर राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर त्यांची फाईट जुन्या सहकाऱ्याविरोधातच होईल.

लोकसभेत पराभव

लोकसभा निवढणुकीत राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला. राजू शेट्टी हे या मतदारसंघातून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2019 च्या निवडणूक युवा उमेदवार धैर्यशील माने यांनी पराभव केला.

शिरोळ विधानसभा मतदारसंघ

शिरोळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद असलेला मतदारसंघ आहे. मात्र याठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. 2014 मध्ये स्वाभिमानीतून बाहेर पडून उल्हास पाटील यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. स्वाभिमानीची सगळी आंदोलन अंगावर घेतलेला साधा माणूस म्हणून उल्हास पाटील यांच्याकडे पाहिलं जातंय. मात्र 2014 मध्ये त्यांनी स्वाभिमानीच्या उमेदवाराबरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विजय मिळवला. त्यावेळी पाटील यांना 70,809 मतं मिळाली तर दोन नंबरची मत राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ५०,७७७ मतं मिळाली. या मतदार जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालवलं जातं. त्यामुळं आगामी विधानसभेला कुणाची ताकद दिसून येतं हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

Hatkanangle Lok sabha result 2019 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निकाल   

कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय? 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI