शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या

| Updated on: Oct 18, 2021 | 9:15 AM

माजी खासदार राजू शेट्टी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर तुफानी हल्ले चढवतायत. आता तर त्यांनी शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच आहेत किंबहुना त्यांचं एकमत आहे, अशी जळजळीत टीका केली आहे.

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या
नरेंद्र मोदी-शरद पवार आणि राजू शेट्टी
Follow us on

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर तुफानी हल्ले चढवतायत. आता तर त्यांनी शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच आहेत किंबहुना त्यांचं एकमत आहे, अशी जळजळीत टीका केली आहे.

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच

साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसतं मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचं एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसं, असा सवालही राजू शेट्टी यांनी विचारला. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधी शड्डू ठोकणार पहिला मी असेन, असंही राजू शेट्टी सांगायला विसरले नाही.

यांनी एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातलाय

एफआरपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. “केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात,” असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.

शेट्टी पवारांमध्ये कलगीतुला का?

शेतकऱ्यांना उसाची सगळी रक्कम एकाच टप्प्यात दिली पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांची आहे. तर पवारांनी मात्र उसाची रक्कम एका टप्प्यात न देता तीन टप्प्यात द्यावी, अशी भूमिका मांडताना त्याच्या पाठीमागील फायदे तोटे सांगितले आहेत. एकंदरितच याच मुद्द्यावरुन शेट्टी पवारांमध्ये कलगीतुला रंगला आहे.

एफआरपी एका टप्प्यात नको, पवारांनी साखरेचं गणित समजावलं!

मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. उसाला एक रकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या अस म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.

हे ही वाचा :

शेट्टी, खोत म्हणतात, ऊसाची एकरकमी द्या, पवार म्हणाले, गुजरातकडे बघा, शेतकऱ्यांचा कसा फायदा झाला?