AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची लिस्ट आमच्याकडे, पराभवानंतर संजय राऊतांची ‘पाहून’ घेण्याची भाषा

निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्यांची नावं उघड करताना संजय राऊतांनी या आमदारांना इशारा दिला. ते म्हणाले, ' ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. नावं आमच्याकडे आहेत..

Rajya Sabha Election 2022: ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची लिस्ट आमच्याकडे, पराभवानंतर संजय राऊतांची 'पाहून' घेण्याची भाषा
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 11, 2022 | 11:39 AM
Share

मुंबईः राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी दगाबाजी झाल्यानं शिवसेनेचा पराभव झाला. यामुळे उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला आहे. संजय राऊत यांच्या निकालानंतरच्या प्रतिक्रियांतून हा संताप स्पष्ट होतोय. निवडणुकीत ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची लीस्ट माझ्याकडे आहे. या सगळ्यांकडे पाहून घेणार.. असे शब्द संजय राऊतांनी वापरलेत. शनिवारी पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) मतदानात दगाबाजी केलेल्यांची नावंही उघड केली. घोडेबाजारात जे उभे होते, ते विकले गेले. पण या व्यवहारात आम्ही पडलो नाहीत, असं वक्तव्यही त्यांनी केलं. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार पराभव झाला आणि भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. मात्र यापूर्वी मतदानावरील आक्षेप आणि मतमोजणीतील विलंब या दरम्यान अवघ्या महाराष्ट्रानं एक मोठं राजकीय नाट्य अनुभवलं. आता या नाटकातील एक एक खेळी उलगडल्या जात आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यसभा निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही, याचा अर्थ असा नाही की कोणी तरी दैदिप्यमान विजय मिळवला. असं नाही. ठिक आहे. भाजपने एक जागा जिंकली. ३३ मते पहिल्या क्रमांकाची आम्हाला मिळाली आहे. २७ मते भाजपला मिळाली. तसे म्हटलं तर ३३ आणि २७ मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रिया वेगळी असते. पहिल्या पसंतीचे दुसऱ्या पसंतीचे मते पाहिली जातात. काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली अस्ं वाटतं मला. किंवा इतर काही कारणं असेल. त्यामुळे आमची अपक्षांची सहा मते आम्हाला मिळाली नाही. ते कुणाचेच नसतात. असे लोक कुणाचेच नसतात. पण जे घटक पक्ष आहेत. आमचे लोक आहेत. छोटे पक्ष आहेत जे शिवसेना किंवा आघाडीबरोबर आहेत. त्यांचं एकही मत फुटलं नाही.’

‘दगाबाजांना पाहून घेणार’

निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्यांची नावं उघड करताना संजय राऊतांनी या आमदारांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘ ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. नावं आमच्याकडे आहे. कुणी मते दिले नाही हे आम्ही माहीत आहे. कांदे यांचं मत का बाद केलं हा संशोधनाचा विषय आहे. कांदे याचं मत ज्या कारणासाठी बाद झालं. त्याच कारणासाठी आम्ही मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतला. अमरावतीच्या शहाण्याचं मत बाद व्हायला हवं होतं. यांना पहाटेची फार सवय आहे पापकर्म करायची. त्यांचा पहाटेपर्यंत उपक्रम सुरू होता. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा घोडेबाजार करत राहा. ‘

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...