शिवसेनेच्या संजय पवारांची मतं धोक्यात? धनंजय महाडिक म्हणतात, आमच्याकडे संख्याबळ

| Updated on: Jun 10, 2022 | 8:57 AM

शरद पवारांनी एनसीपीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांची जागा धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेच्या संजय पवारांची मतं धोक्यात? धनंजय महाडिक म्हणतात, आमच्याकडे संख्याबळ
Follow us on

राज्यसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. मात्र या निवडणुकीच्या पूर्वीच महाविकास आघाडीमधील गोंधळ वाढला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या काही तास आधीच महाविकास आघाडीत बिघाडी पहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शरद पवारांनी एनसीपीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांची जागा धोक्यात आली आहे.  तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत, नार्वेकरांनी पवरांची भेट घेतलीये.