Rajyasabha Eleciton : संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्यास सेनेचा प्लॅन बी तयार, कोणाला देणार उमेदवारी? वाचा एका क्लिकवर

Rajyasabha Eleciton : संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्यास सेनेचा प्लॅन बी तयार, कोणाला देणार उमेदवारी? वाचा एका क्लिकवर
संभाजीराजे छत्रपती, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9

छत्रपती संभाजी राजे यांनी शिवसेनेचा पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव नाकारल्यास शिवसेनेचा 'प्लान बी' तयार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला राज्यसभेचा उमेदवार घोषित करण्याचा शिवेसनेचा प्लॅन आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 22, 2022 | 7:54 PM

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून (Rajyasabha Eleciton) सध्या राजकारण शिगेला पोहोचले आहे. छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Chhatrapati ) यांनी शिवसेनेचा पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव नाकारल्यास शिवसेनेचा ‘प्लान बी’ तयार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला राज्यसभेचा उमेदवार घोषित करण्याचा शिवेसनेचा प्लॅन आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमधून उमेदवाराची निवड होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी उमेदवारीसाठी पक्षातील काही निष्ठावंतांची नावेही तयार ठेवली आहेत. छत्रपती संभाजी राजे यांना उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ येथे शिवबंधन बांधण्यासाठी येण्याचा निरोप दिला आहे.आता छत्रपती संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सहाव्या जागेचा सस्पेन्स काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये.

राजेंच्या उमेदवारीवरील प्रतिक्रिया

नाना पटोले काय म्हणाले?

संभाजी राजे यांच्याबद्दल त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण सहाव्या उमेदवाराचा जो विषय आहे तो महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची मते लागणार आहेत, म्हणून शिवसेनेकडे उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार असेल. त्यामुळे सर्व पक्षांना विश्वासात घेऊन उमेदवार जाहीर करावा अशी आमची भूमिका आहे, मुख्यमंत्री त्या पद्धतीचा निर्णय करतील अशी आमची अपेक्षा आहे, असे मत याबाबत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे मत विचारात घेऊन शिवसेना ही उमेदवारी देणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या भाजप वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. भाजपने राजेंना अपक्ष लढण्याची अट घातल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा संघटना राजेंसाठी सरसावल्या

छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधाचा वारसा असल्यामुळे शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवावे अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेडने केलीय. मराठा मोर्चाचे समन्वयक तथा स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केलीय. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यातील चारही प्रमुख राजकीय पक्षांनी मदत करावी असे आवाहन देवसरकर यांनी केलंय. देवसरकर यांच्या या मागणीला सोशल मीडियावर चांगलंच समर्थन मिळतंय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, शिवसेनेने छत्रपती यांना बिनशर्त पुरस्कृत केल्यास मराठा समाजात चांगला संदेश जाईल, तसेच राजेंनी अपक्षच निवडणूक लढवावी असेही देवसरकर व्हीडिओत म्हणाले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें