अभिनेता गोविंदा शिंदे गटात येताच माजी मंत्री राम नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तो कधीच…

प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा यांची ही दुसरी राजकीय इनिंग आहे. 14 वर्षापूर्वी गोविंदा यांनी काँग्रेसमधून राजकीय श्रीगणेशा केला होता. त्यावेळी त्यांनी राम नाईक यांचा पराभव करून दिल्ली गाठली होती. यावेळीही गोविंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गोविंदा कुठून उभे राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अभिनेता गोविंदा शिंदे गटात येताच माजी मंत्री राम नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तो कधीच...
अभिनेता गोविंदा शिंदे गटात येताच काय म्हणाले राम नाईक ?
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 2:05 PM

अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा यांनी तब्बल 14 वर्षानंतर पुन्हा एकदा राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे गोविंदा यावेळी कोणत्या मतदारसंघातून उभं राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागच्यावेळी गोविंदा काँग्रेसमधून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे गोविंदा यांची एकच चर्चा रंगली होती. यावेळी राम नाईक यांनी गोविंदा यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. आता गोविंदा शिवसेनेत आल्यानंतर राम नाईक यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मतावर आपण आजही ठाम असल्याचं राम नाईक यांनी म्हटलं आहे.

राम नाईक यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोविंदा यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. गोविंदा यांच्यासोबत माझा परिचय आहे. पण मी त्यांना कधीच मित्र म्हणू शकणार नाही. ते माझ्याविरोधात निवडणूक लढले आणि जिंकले होते. आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. गोविंदा यांनी उमेदवारी मिळाल्यावर काही भूमिका मांडल्यास त्यावर मी नक्की बोलेल. तेच योग्य होईल, असं राम नाईक म्हणाले.

खोटं बोलतात असं वाटतं

राजकारणात जर तर असं काही नसतं. होय किंवा नाही या दोन शब्दातच सर्व काम करायचं असतं. गोविंदा खोटं बोलतात की काय अशी रुखरुख माझ्या मनात कायम आहे. मी राजकारण सोडलं आहे. मी राजकारणात जाणार नाही, असं गोविंदा एकदा नव्हे तर दोन तीन वेळा बोलले. त्यानंतर ते पुन्हा राजकारणात आले. त्यामुळे ते खोटं बोलत असल्याचं मला वाटतंय, असा चिमटा नाईक यांनी काढला.

गोविंदा आणि दाऊद संबंध?

यावेळी त्यांनी गोविंदा यांनी दाऊदची मदत घेतल्याच्या आपल्या आरोपावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. माझ्या आरोपावर मी ठाम आहे. त्यांनी माझे आरोप फेटाळून लावले नाही. त्याला चॅलेंजही केलं नाही. त्याचे कोणी मित्रही इतक्या वर्षात आरोप खोडून काढायला आले नाही. माझ्या पुस्तकात मी या आरोपाचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशित होऊन सात आठ वर्षही झाले आहेत. इतक्या वर्षात ते काहीच बोलले नाही. माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जाईल असं काही मी कधी इतक्या वर्षात बोललो नाही. शब्द मागे घेण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही. मी विचार करूनच बोलत असतो, असंही ते म्हणाले.

पूर्वी सारखी शिवसेना नाही

भाजपने जे काही उमेदवार दिले आहेत. ते योग्यच आहेत, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद नाही. त्यांना लोकांचं पाठबळ नाही. त्यांचा मुंबईत आमदारही कधी निवडून आलेला नाही. शिवसेनेची अवस्थाही तशीच झाली आहे. शिवसेनेतून एक मोठा गट बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखी शिवसेना राहिली नाही, असं राम नाईक यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. इंडिया आघाडीला उमेदवार जाहीर करता करता नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.