टी20 वर्ल्डकपपूर्वी हार्दिक पांड्याचं उपकर्णधारपद जाणार? या विकेटकीपर बॅट्समनकडे सोपवणार धुरा!

आयपीएल स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या निवडीवरून चर्चा रंगली आहे. संघात कोण असेल कोण नसेल यावरून बरीच खलबतं सुरु आहेत. खेळाडूंच्या निवडीसाठी जोर बैठका सुरु आहे. आता हार्दिक पांड्याचं उपकर्णधारपद राहणार की जाणार? याबाबतही चर्चेला जोर आला आहे.

टी20 वर्ल्डकपपूर्वी हार्दिक पांड्याचं उपकर्णधारपद जाणार? या विकेटकीपर बॅट्समनकडे सोपवणार धुरा!
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 6:53 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये असणार आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी एकूण 20 संघांमध्ये लढत होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड 1 मे रोजी केली जाणार आहे. या निवडीदरम्यान हार्दिक पांड्याचं उपकर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडसमिती ऋषभ पंतकडे पुन्हा एकदा भारतीय संघाचं उपकर्णधारपद सोपवण्याची शक्यता आहे. क्रिकबजने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. पंत डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या रस्ते अपघातात जखमी झाला होता. त्यानंतर त्याने थेट आयपीएलमधून क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन केलं असून दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळत आहे. असं असलं तरी ऋषभ पंतने यापूर्वी टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत कर्णधारपद भूषवलं होतं. एकंदरीत ऋषभ पंत विकेटकीपर आणि लीडरशिपच्या भूमिकेत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

दुसरीकडे, ऋषभ पंतला लीडरशिपच्या भूमिकेत संघात आणणं वाटतं तितकं सोपं नाही. हार्दिक पांड्या असताना असं करणं खूपच मोठा निर्णय ठरू शकतो. पण काही गोष्टी ऋषभ पंतच्या बाजूने दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यात ऋषभ पंतने चांगल्या प्रकारे नेतृत्व हाताळलं होतं. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अभाव दिसून आल्याचं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. तसेच, क्रिकबझने आपल्या रिपोर्टमध्ये युझवेंद्र चहलला डावललं जाण्याची शक्यताही वर्तवली आहे. तर जसप्रीत बुमराहसह वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात संदीप शर्मा असू शकतो. 2015 नंतर संदीप शर्मा टीम इंडियात खेळलेला नाही.

भारतीय संघात फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला संधी मिळू शकते.दुसरीकडे, रवि बिष्णोई अक्षर पटेलवर भारी पडू शकतो. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाज म्हणून ताफ्यात असू शकतात. तर चौथा वेगवान गोलंदाज म्हणून संदीप शर्माची निवड होऊ शकत. राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या संदीप शर्माने स्लो मीडियम पेसने प्रभाव टाकला आहे. अमेरिका वेस्ट इंडिजच्या धीम्या खेळपट्टीवर प्रभाव ठरू शकतो.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.