Arun Govil Net Worth : लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या रामायणातील रामाची एकूण संपत्ती किती?

रामायणातील रामाच्या भूमिकेने अरुण गोविल यांना एक ओळख मिळवून दिली. त्यांची एकूण संपत्ती किती आहे? त्यांचं शिक्षण किती झालय? रामायणातील एका एपिसोडसाठी त्यांना किती रक्कम मिळायची? त्यांनी कधी आलिशान कार घेतली? या बद्दल जाणून घ्या.

Arun Govil Net Worth : लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या रामायणातील रामाची एकूण संपत्ती किती?
arun govil
| Updated on: Mar 26, 2024 | 1:57 PM

‘रामायण’ ही छोट्या पडद्यावरील गाजलेली पौराणिक मालिका आहे. या मालिकेत रामाच पात्र रंगवणारे अरुण गोविल आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपाने त्यांना मेरठमधून निवडणुकीच तिकीट दिलं आहे. ‘रामायण’ या मालिकेमुळे अरुण गोविल यांचा देशभरात चाहता वर्ग आहे. अरुण गोविल हे रामाच्या भूमिकेत लोकांना इतके भावले की, लोक आजही त्यांच्या पाया पडतात. आशिर्वाद घेतात. 12 जानेवारी 1958 रोजी मेरठमध्ये अरुण गोविल यांचा जन्म झाला. त्यांच बालपण शाहजहांपूरमध्ये गेलं.

अरुण गोविल यांनी टीवी सीरियल ‘रामायण’ शिवाय अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. पण त्यांना खरी प्रसिद्धी रामाच्या भूमिकेमुळे मिळाली. आता ते राजकारणात नवीन इनिंग सुरु करणार आहेत. अरुण गोविल यांची एकूण संपत्ती किती आहे? रामायणाच्या एका एपिसोडसाठी ते किती रक्कम आकारायचे? त्या बद्दल जाणून घेऊया.

अरुण गोविल यांनी कुठल्या चित्रपटांमध्ये काम केलय?

अरुण गोविल अलीकडेच ‘आर्टिकल 370’ चित्रपटात दिसले होते. 1979 मध्ये अरुण गोविल ‘सावन को आने दो’ आणि ‘सांच को आंच नहीं’ या चित्रपटांमध्ये काम केलेलं. त्यांचा पहिला चित्रपट ‘पहेली’ 1977 मध्ये आला होता. अरुण गोविल यांनी ‘लव कुश’, ‘ससुराल’, ‘शिव महिमा’, ‘गंगा धाम’, ‘जुदाई’, ‘जियो तो ऐसे जियो’, ‘राधा और सीता’, ‘मुकाबला’, ‘हुकुस बुकुस’, ‘ओएमजी 2’ आणि ‘आर्टिकल 370’ सारख्या अनेक चित्रपटात काम केलं.

किती शिक्षण झालय?

रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच सुरुवातीच शिक्षण मेरठमध्ये झालय. मेरठच्या चौधरी चरण सिंह यूनिवर्सिटीमधून त्याने इंजिनिअरींगची पदवी घेतली. त्यानंतर अरुण यांनी थिएटर आणि अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. 1975 साली अरुण मुंबईत आले. ते आपल्या भावाच्या घरी रहायचे. त्यांना सर्वातआधी विक्रम वेताळचा शो मिळाला. त्यानंतर रामायणातील रामाची भूमिका मिळाली.

रामायणाच्या एका एपिसोडसाठी किती रक्कम मिळायची?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुण गोविल यांना रामायणाच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्यावेळी जवळपास 51 हजार रुपये मिळायचे. असं पाहिल्यास त्यांना रामायण सीरियलसाठी 40 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असेल. त्यानंतर ‘ओह माय गॉड 2’ मध्ये भूमिकेसाठी त्यांनी 50 लाख रुपये घेतले.

एकूण संपत्ती किती कोटी?

रिपोर्ट्स नुसार, अरुण गोविल यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. वर्ष 2022 मध्ये त्यांनी जवळपास 60 लाख रुपयांची लग्जरी कार विकत घेतली. त्याशिवाय मुंबईत त्यांच्याकडे एक आलिशान घर आहे. अभिनय आणि जाहीराती हे त्यांच्या कमाईच माध्यम आहे.