विरोधी पक्षनेता होण्यासाठी रामदास कदमांकडून जादूटोणा : सूर्यकांत दळवी

| Updated on: Sep 09, 2019 | 1:35 PM

पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) भगत आणि जादूटोणावाले (Witchcraft) असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे (Shivsena) दापोली (Dapoli) विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेता होण्यासाठी रामदास कदमांकडून जादूटोणा : सूर्यकांत दळवी
Follow us on

रत्नागिरी: पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) भगत आणि जादूटोणावाले (Witchcraft) असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे (Shivsena) दापोली (Dapoli) विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी केला आहे. रामदास कदम बंगाली बाबांना (Bangali Baba) घेऊन फिरतात. विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील कदम यांनी आमच्यासोबत भगत पाठवला होता, असा गौप्यस्फोट सूर्यकांत दळवींनी केला.

चंद्रकांत दळवी म्हणाले, “रामदास कदम भगत आणि जादूटोणावाले आहेत. ते दर अमावस्येला भगतगिरी करायचे. ते बंगालीबाबांना घेऊन फिरतात. विरोधी पक्षनेता बनण्यासाठी देखील कदम यांनी आमच्यासोबत भगत पाठवला होता. ते त्यांच्या जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली बाबांकडून कोहळे कापून घेतात.”

‘कदमांनी पराभव झाला त्याच ठिकाणाहून उभं रहावं’

रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये. ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, त्याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी. माझ्या मतदारसंघात मी आमदार नसलो, तरी चालेल. पण या मतदारसंघात पक्षासाठी योगदान असणाराच उमेदवार हवा, असंही सूर्यकांत दळवी म्हणाले.

‘रामदास कदमांनी चारवेळा पक्षविरोधी काम केलं’

रामदास कदम यांनी आतापर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केलं आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा सूर्यकांत दळवींनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी वाढणार असल्याचं दिसत आहे.