थोरल्या पवारांकडून रोहित पवारांच्या खांद्यावर अजून एक मोठी जबाबदारी, कोणत्या मतदारसंघात आता रोहित पवारांचा शब्द प्रमाण?

| Updated on: Feb 17, 2022 | 9:00 PM

थोरले पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत खुद्द रोहित पवार यांनीच ट्वीट करुन माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर भूम-परंडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्या खांद्यावर दिली आहे.

थोरल्या पवारांकडून रोहित पवारांच्या खांद्यावर अजून एक मोठी जबाबदारी, कोणत्या मतदारसंघात आता रोहित पवारांचा शब्द प्रमाण?
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. या निवडणुकीत राष्ट्रवादीची रणनिती ठरवण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची मोठी भूमिका राहिली. कर्जत नगर पंचायत निवडणुकीतही रोहित पवारांनी माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांना मोठा झटका दिला. या पार्श्वभूमीवर आता थोरले पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत खुद्द रोहित पवार यांनीच ट्वीट करुन माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर भूम-परंडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्या खांद्यावर दिली आहे.

‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे’, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

2024 विधानसभेची राष्ट्रवादीकडून पायाभरणी?

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघात आता राष्ट्रवादीला आता पुन्हा पाळंमुळं रुजवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळेच आता युवा नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्याचं काम राष्ट्रवादीकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी त्या-त्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व जुने आणि नेते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, असतील तर त्यांच्यातील वाद मिटवून लोकांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. आतापासूनच ते काम हाती घेतल्यावर 2024 च्या विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अधिक बळकट होईल, या हिशोबानं राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे.

इतर बातम्या :

‘मेरा पैसा वापस कर’, मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?

IPL Auction 2022 मध्ये मिळाले फक्त 20 लाख, मुंबईच्या टॅलेंटेड फलंदाजाचं चौथं शतक, कोण आहे तो?