अजित पवारांच्या फोननंतरही रोहित पवार सत्कार सोहळ्याला आले नाहीत, कारण स्वत:च सांगितलं!

अजित पवारांचा हा भव्य कार्यक्रम असूनही, पवार कुटुंबातील या महत्त्वाच्या व्यक्तींची अनुपस्थिती जाणवणारी होती.  रोहित पवार हे या कार्यक्रमाला का आले नाहीत, याबाबत टीव्ही 9 मराठीने त्यांनाच विचारलं.

अजित पवारांच्या फोननंतरही रोहित पवार सत्कार सोहळ्याला आले नाहीत, कारण स्वत:च सांगितलं!
| Updated on: Jan 11, 2020 | 3:28 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार काल बारामतीत करण्यात आला. अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. अजित पवारांच्या (Rohit Pawar on Ajit Pawar) या भव्य मिरवणुकीला असंख्य बारामतीकर उपस्थित होते. मात्र या सत्कार सोहळ्याला ना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते, ना रोहित पवार ना सुप्रिया सुळे होत्या. (Rohit Pawar on Ajit Pawar)

अजित पवारांचा हा भव्य कार्यक्रम असूनही, पवार कुटुंबातील या महत्त्वाच्या व्यक्तींची अनुपस्थिती जाणवणारी होती.  रोहित पवार हे या कार्यक्रमाला का आले नाहीत, याबाबत टीव्ही 9 मराठीने त्यांनाच विचारलं.

त्यावर रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा कालचा सत्काराचा कार्यक्रम हा अचानक ठरला होता. त्यावेळी मी कर्जतला मतदारसंघात होतो. मला दादांचा फोन आला, कुठे आहेस विचारलं. तेव्हा मी मतदारसंघात आणि लोकांमध्ये असल्याचं सांगितलं. तेव्हा दादांनी सत्कार अचानक ठरला आहे, आपल्याला लोक महत्वाचे आहेत लोकांसोबत राहा असं सांगितलं. त्यामुळे मी कार्यक्रमाला नव्हतो”

पवार कुटुंब हे एक आहे, एक राहील आणि विकासासाठी सदैव एकत्र राहील हे सांगतो, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवार यांचा जंगी सत्कार

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार बारामतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्याशिवाय बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शहरातील शारदा प्रांगणात नागरी सत्कार झाला. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) करण्यात आली.

या भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं. आजचा सत्कार हा आगळा वेगळा आहे. हा सत्कार माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. आजच्या मिरवणुकीमुळे खूप आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. माझे शाळेचे मित्र आज भेटले, असं अजित पवार म्हणाले. येत्या 16 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत येणार आहेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या  

ना शरद पवार, ना रोहित, ना सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सत्काराला फक्त पत्नी आणि मुलगा  

…म्हणून पत्नी सुनेत्रा मुंबईतून निघून आली : अजित पवार