AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाबरु नका, तुम्ही बिनधास्त रोल करा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांना रूपाली ठोंबरे यांचा फोन

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृ्त्यांवर दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांच्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

घाबरु नका, तुम्ही बिनधास्त रोल करा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांना रूपाली ठोंबरे यांचा फोन
rupali patil, deepali sayyas and rupali chakankar
| Updated on: May 30, 2026 | 9:23 PM
Share

देश हादरवून टाकणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’नावाचा सिनेमा येऊ घातलाय. या चित्रपटाचे लवकरच शुटींग सुरु होणार असून या चित्रपटात मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्वाची भूमिका करणार आहेत. आपण या चित्रपटात काम करु नये अशा आपल्याला फोनवरुन धमक्या आल्याचे दीपाली सय्यद यांनी मागे म्हटले होते. आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या दीपाली यांच्या बचावासाठी पुढे आल्या असून त्यांनी दीपाली सय्यद यांना तुम्ही बिनधास्त चित्रपटात काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत असेही पाटील यांनी म्हटले आहे.

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचारावर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’नावाचा सिनेमा दिग्दर्शक स्वरूप बी सावंत काढत आहेत. या मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची भूमिका करणार आहेत असे म्हटले जात आहे. मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मला ही भूमिका न करण्यासाठी मोबाईलवरुन धमक्या आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद यांना फोन करुन दिलासा दिला आहे.

त्या घाबरणाऱ्या नाहीत…

रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की ‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल्स’ चित्रपटात रूपाली चाकणकर यांची भूमिका अभिनेत्री दिपाली सय्यद या करणार आहेत. त्यांना आपण फोन करून आश्वासन दिले आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही घाबरू नका असा दिलासा दिल्याचे त्या म्हणाल्या. अशोक खरात याचे भक्त असलेले आणि ओष्णोजल प्यायलेले लोक अभिनेत्री दिपाली सय्यद यांना फोन करून धमक्या देत आहेत. कलाकाराचं काम आहे अभिनय करण्याचं. तुम्ही त्यांना धमक्या देता, त्यातूनच तुमची कृती दिसून येते. आम्ही अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यासोबत आहोत. दिपाली सय्यद या उत्तम अभिनेत्री असून त्या घाबरणाऱ्या नाहीत असेही रुपाली ठोंबरे – पाटील यांनी म्हटले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा