राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन, भाजप नेत्या चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी

| Updated on: Jul 04, 2021 | 6:23 PM

सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आल्याचं ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये सक्षणा यांनी एक मोबाईल नंबरही दिलाय. सक्षणा यांच्या ट्वीटवरुन आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केलाय. तसंच याबाबत आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय.

राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन, भाजप नेत्या चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर
Follow us on

मुंबई : भाजप नेत्या गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पडळकरांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनीही पडळकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मात्र, त्यावरुनच सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आल्याचं ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये सक्षणा यांनी एक मोबाईल नंबरही दिलाय. सक्षणा यांच्या ट्वीटवरुन आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केलाय. तसंच याबाबत आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. (Sakshana Salgar receives threatening phone call, Chitra Wagh instructed to lodge a police complaint)

‘मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता’, असं ट्वीट सक्षणा सलगर यांनी केलं आहे. त्यात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केलाय.

चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी

सक्षणा सलगर यांनी केलेल्या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांनी आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दर्शवलाय.

संबंधित बातम्या :

‘स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या’, आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

Sakshana Salgar receives threatening phone call, Chitra Wagh instructed to lodge a police complaint