Maharashtra politics: ‘बाबा शिवसैनिकांना जीपीएस ट्रॅकर बांधुया’; प्रमाणपत्रावरून पुन्हा एकदा संदीप देशपांडेंचा टोला

| Updated on: Jul 04, 2022 | 8:40 AM

आज पुन्हा एकदा ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रमाणपत्रावरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra politics: बाबा शिवसैनिकांना जीपीएस ट्रॅकर बांधुया; प्रमाणपत्रावरून पुन्हा एकदा संदीप देशपांडेंचा टोला
Follow us on

मुंबई :  पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसैनिकांना आता एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यावरून रविवारी संदीप देशपांडे यांनी शिवसेना (shivsena) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे हे मी हिंदुत्व सोडणार नाही असे लिहून देणार का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये बाबा मला एक आयडीया सूचली आहे. आपण आता शिवसैनिकांना शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राऐवजी जीपीएस  ट्रॅकरच बांधुया का? असा प्रश्न आदित्य ठाकरे हे आपल्या वडिलांना उद्धव ठाकरे यांना विचारताना दिसत आहेत.

ट्विटमध्ये नेमके काय?

संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काल प्रमाणपत्रांवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. आज पुन्हा एकदा त्यांनी एक व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकांनी दिलेले प्रतिज्ञापत्र आहे. दुसरीकडे टीव्ही चालू आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हातात जीपीएस ट्रॅकर असून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत आहे की बाबा मला एक आयडीया सूचली आहे. आपण शिवसैनिकांना शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राऐवजी जीपीएस ट्रॅकरच बांधुयात का? असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

 

शिवसैनिकांना सादर करावे लागणार प्रतिज्ञापत्र

जवळपास 40 पेक्षा अधिक आमदार आणि आठ मंत्री शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडले. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकाचवेळी एवढ्या मोठ्यासंख्येने आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. यानंतर आता शिवसेनेने सावध पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसैनिकांना तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या प्रमाणपत्रामध्ये माझा ठाकरे यांच्या नेत्वृत्वावर पूर्ण विश्वास आहे, असा मजकूर असणार आहे. शिवसेनेचे आमदार, नगरसेवक, शिवसैनिक, पदाधिकारी अशा सर्वांकडूनच हे प्रमाणपत्र घेतले जाणार आहे. शिवसेनेच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे.