AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील; संदीप देशपांडेचा राऊतांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर राऊत मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. कालही राज यांनी राऊतांवर टीका केली होती. तर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राऊतांवर निशाणा साधला आहे.

काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील; संदीप देशपांडेचा राऊतांना टोला
संदीप देशपांडे Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 10:05 AM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केल्यानंतर राऊत मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. कालही राज यांनी राऊतांवर टीका केली होती. तर आज मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट करून राऊतांवर निशाणा साधला आहे. जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात. काहींना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात. या पुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, अशी टीका संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्यावर नाव न घेता केली आहे. त्यामुळे राऊत आता या टीकेला कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राऊत रोज सकाळी माध्यमांशी संवाद साधतात. केंद्रातील भाजप सरकारवर राऊत टीका करतात आणि दिवसभर त्याचा धुरळा उडतो. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाना साधला होता. आता मनसेनेही राऊतांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

पुण्याच्या सभेत राऊतांची नक्कल आणि टीका

मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली. यावेळी राज यांनी राऊतांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज यांनी केला होता.

राऊतांचे प्रत्युत्तर

राज यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचं राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय.

राज यांचा पुन्हा हल्ला

राऊत यांनी राज यांच्यावर खोचक टीका केल्यानंतर राज यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आता संजय राऊत नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

राष्ट्रीय नेता म्हणून मोदींना आज पर्याय नाही, संजय राऊत यांचं ‘रोखठोक’ विधान

खरे सोने असल्याचे सांगून माजी सैनिकाला फसवले, तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update : अंबाबाई आणि जोतिबा भाविकांसाठी दिलासादायक बातमी

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.