AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेने जे पेरलं तेच उगवत आहे; माझ्यावरही…, प्रभादेवीतल्या राड्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

मुंबईच्या प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिक आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे देखील पहायला मिळाले. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेने जे पेरलं तेच उगवत आहे; माझ्यावरही..., प्रभादेवीतल्या राड्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
Image Credit source: social media
| Updated on: Sep 11, 2022 | 10:36 AM
Share

मुंबई :  मुंबईच्या (Mumbai) प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिक (Shivsena) आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे देखील पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता 25  शिवसैनिकांवर दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत हा काय बिहार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हटलं संदीप देशपांडे यांनी?

दादर, प्रभादेवी, माहीम हे सुसंस्कृत मतदासंघ आहेत. अशा हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य नाही. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांत जे पेरलं तेच आता उगवत असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसे आंदोलनाच्यावेळी माझ्यावरही पोलीस भगिनीला धक्का मारल्याचा खोटा आरोप करून केस दाखल करण्यात आली होती, असंही यावेळी देशपांडे यांननी म्हटलं आहे.

‘लोकांना खोट्या केसमध्ये अडकवलं’

तुम्ही लोकांवर खोट्या केस टाकल्या त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावरही खोटी केस झाली. शिवसेनेने अडीच वर्षात जे पेरलं तेच आता उगवत असल्याचा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 25  शिवसैनिकांवर दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...