संजय राऊतांच्या देवेंद्र फडणवीसांना खोचक शुभेच्छा

शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.' असं संजय राऊतांनी लिहिलं आहे.

संजय राऊतांच्या देवेंद्र फडणवीसांना खोचक शुभेच्छा

मुंबई : ‘महाराष्ट्रात विरोधीपक्षच राहणार नाही, असा दावा करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा’ असं ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना चिमटे (Sanjay Raut Congratulates Fadnavis) काढले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले होते.

संजय राऊत यांनी ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील या दोघांचेही आभार मानले. ‘शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.’ असं राऊतांनी लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं दिसलं नाही. फडणवीसांनी केवळ फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमतून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेली दरी वाढत असल्याचं दिसत आहे.

शुभेच्छांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून पहिलं टीकास्त्रही सोडलं. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या किमान समान कार्यक्रमावर फडणवीसांनी आक्षेप घेतला. ‘महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!’ असं फडणवीस (Sanjay Raut Congratulates Fadnavis) म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत फडणवीसांना पोस्टरमधून टोले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI